आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२०१४ मधील सर्वात मोठा पराभव आणि अनेक राज्यांमध्ये पराभव किंवा सरकार गमावल्यानंतर कर्नाटकचा विजय काँग्रेससाठी संजीवनी आहे. या वर्षी छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण व मिझोराममध्ये निवडणुका आहेत. या राज्यांचे निकाल भाजपला अनुकूल आले नाही तर काँग्रेसला मानसिक बळ मिळेल. कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसने महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे मुद्दे मुख्य मुद्दे असल्याचे संकेत दिले आहेत. याच मुद्द्यांवर भाजपवर मात करता येईल. दुसरीकडे हिंदुत्व, विकास आणि मोदी फॅक्टरच्या भरवशावर निवडणूक रथावर स्वार भाजप कर्नाटकवरून निराश न होता आपल्या कार्यकर्त्यांना जय-पराजय होत असतो, याचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे सांगत आहे. वास्तविक, कर्नाटकमध्ये नेतृत्वासह निवडणुकीच्या राजकीय मुद्द्यांवर भाजप संभ्रमात राहिला. काँग्रेस सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या चेहऱ्यांसह मैदानात होती. अशा वेळी भाजपला या राज्यांत स्थानिक नेतृत्वाबाबत स्पष्ट भूमिका असायला हवी होती.
छत्तीसगड: काँग्रेसही हिंदुत्वाच्या मार्गावर
९ वर्षांत काँग्रेसला सर्वात मोठा विजय छत्तीसगडमध्ये मिळाला होता. भूपेश बघेल ग्रामस्थ, महिला तरुण, मजूर, शेतकरी आदिवासी यांच्यासाठी योजनांद्वारे कोअर व्होट बँक जोडत आहे. तर राम वन गमन पथ, माता कौशल्या मंदिरसारख्या कामांनी भाजपच्या हिंदुत्वाची विचारसरणी मोडून काढत आहे. भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. पण भाजपला स्थानिक चेहरा स्पष्ट न करणे महागात पडेल.
राजस्थान : काँग्रेस गोंधळली, भाजपही!
सीएम अशोक गहलोत व सचिन पायलटमध्ये ओढाताण सुरू आहे. भाजपमध्येही नेतृत्वाची स्पष्टता नाही. गहलोत चिरंजीवी योजना व ५०० रु. त सिलिंडर देण्याच्या घोषणांनी महिला, ग्रामस्थ व एससी-एसटी वर्गांमध्ये पोहोचत आहे. तर भाजप पेपर लीक, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या आरोपावर घेरण्यात व्यग्र आहे. मात्र नेतृत्व स्पष्ट नसल्याने भाजप पूर्ण आक्रमकतेने मैदानात दिसत नाही.
मप्र: कर्नाटकप्रमाणे सत्ता मिळवली होती
म.प्र.मध्येही भाजपने काँग्रेसचे सरकार पाडून सत्ता मिळवली होती. भ्रष्टाचार, पेपर लीक, बेरोजगारी, महागाई आणि आमदारांची खरेदी असे मुद्दे आहेत. हेच मुद्दे कर्नाटकात वरचढ ठरले. काँग्रेस भाजपच्या फ्लॅगशिप योजना तत्काळ मोडून काढत आहे. भाजपने ‘लाडली बहना’ योजनेत महिलांना १००० रु. देण्याची घोषणा केली तर काँग्रेसने ‘नारी सम्मान’द्वारे १५०० रु. देण्याचे आश्वासन दिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.