आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eid E Milad Un Nabi 2021 । Prime Minister Narendra Modi Along With President Ramnath Kovind Wished Eid E Milad Un Nabi

आज देशभरात ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या देशातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज ईद मिलाद उन-नबी हा सण आहे. हा सण रमझान ईद आणि बकरी ईद प्रमाणेच मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. हा सण प्रामुख्याने ईद-ए-मिलाद किंवा मालविद या नावाने देखील ओळखले जाते. भारतासह जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निमित्ताने अनेकांनी देशातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'मिलाद-उन-नबीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र शांतता आणि समृद्धी असावी, अशी सदिच्छा. प्रेम आणि बंधुत्वाचे मूल्य सदैव विजयी होवो. ईद मुबारक' असे ट्विट करत मोदींनी आपल्या देशातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.

त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ईद-ए-मिलादच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनी, म्हणजेच ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या या पवित्र दिवशी, मी सर्व देशवासीयांना, विशेषकरून आपल्या मुस्लिम बंधु-भगिनींना शुभेच्छा देतो, आपण सगळे मोहम्मद पैंगबर यांच्या आयुष्यामधून प्रेरणा घेऊन, समाजाच्या सुख-शांतीसाठी काम करूया' असे ट्विट करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील देशातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...