आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eid Festival Celebration : AIMPBL, Darul Uloom Deoband And Many Mosque Committees Advised To Follow Corona's Guidelines

ईदसाठी सूचना:मुस्लिम संघटना म्हणाल्या- मशीदमध्ये गर्दी करू नका, घरात राहून नमाज अदा करा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यांनी ईदनिमित्त जारी केल्या गाइडलाइंस

देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPBL), दारूल उलूम देवबंद आणि देशतील अनेक मशीद कमेटींनी यंदा ईदवर कोरोना गाइडलाइंसचे पालन करण्याची सल्ला दिला आहे. देवबंदने फतवा जारी करत म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहता मशीदमध्ये नमाज अदा करणे योग्य नाही. त्याऐवजी आपल्या घरी राहून नमाज अदा करा.

आज पोलिसही कठोर पाऊले उचलत आहेत. दिल्लीतील जामा मशीदच्या परिसरात पोलिसांनी मोठी छावनी बनवली असून, चहुबाजूने पोलिस पाहारा देत आहेत. मशीदमध्ये इमाम आणि मोजक्या लोकांनी नमाज अदा केली आहे, तर इतरांना घरी राहून नमाज अदा करण्याची अपील करण्यात येत आहे.

AIMPBL ने म्हटले की, ईद आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता मशीदमध्ये मोठी गर्दी करणे टाळा. दोन जणांमध्ये सोशल डिस्टेंसिंग ठेवा आणि कोरोना नियमांचे पालन करा. जाणून घ्या मुस्लिम संघटना आणि सरकारने ईद साजरी करण्यासाठी काय सूचना दिल्या आहेत.

दारूल उलूम देवबंद
आजच्या परिस्थितीत जर कोणालाही नमाज अदा करता येत नसेल तर त्याला माफ केले जाईल. एका ठिकाणी एकत्र येण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी नमाज अदा करा. मशीदीत फक्त इमाम आणि त्यांच्यासोबत 3 - 4 जणांनी नमाज अदा करावी. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करा.

AIMPBL
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले की, इस्लामनुसार, सध्याच्या परिस्थितीत लोकांचा जीव वाचणे महत्वाचे आहे. ईदनिमीत्त कोरोना नियमांचे पालन केले जावे. दुकानांवर गर्दी करू नका, नमाजदरम्यान सोशल डिस्टेंसिंग ठेवा.

जामा मशीद आणि फतेहपुरी मशीद
दिल्लीच्या जामा मशीदचे शाही इमाम सैयद अहमद बुखारींनी मुस्लिम समाजाला अपील केली आहे की, ईदची नमाज घरी अदा करा. चांदनी चौकातील फतेहपुरी मशीदचे इमाम मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी म्हटले की, दररोज 4 लाखांपेक्षा जास्त संक्रमित आढळत आहेत. अशी परिस्थितीत तुम्ही घरीच नमाज अदा करा.

महाराष्ट्र- मशीद आणि बाजारांमध्ये गर्दी करू नका
महाराष्ट्र सरकारने ईदनिमित्त गाइडलाइंस जारी केल्या आहेत. सरकारने म्हटले की, ईद सावधगिरीने साजरी करा. नमाज अदा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी करू नका. सामान खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये ठरलेल्या वेळेत जा, पण गर्दी करू नका. मुस्लिम धर्मगुरुंनी नियमांचे पालन करण्याचे आव्हान करावे. महाराष्ट्रप्रमाणेच इतर राज्यांमध्येही सरकारने नियमावली जारी केली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करा घरात नमाज अदा करण्याचे आव्हान केले आहे.

बातम्या आणखी आहेत...