आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eight People Were Burnt Alive After The Assassination Of Trinamool Leader Bhadu | Marathi News

ग्राऊंड रिपोर्ट:बीरभूममधील घृणास्पद कृत्यामागे अवैध धंदे; राजकीय प्रतिष्ठेची लढाई, तृणमूल नेते भादूंच्या हत्येनंतर आठ जणांना जिवंत जाळले होते

बकडुई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट ठाण्यापासून २ किमीवरील बकडुई गावात आठ जणांना जिवंत जाळून मारल्यानंतर गावात स्मशानशांतता पसरली आहे. गावात शिरताच मृतदेह जळाल्याच्या दुर्गंधीने मन कापू लागते. बकडुई गाव व त्याच्या २ किमी अलीकडे मोठा पोलिस फौजफाटा तैनात आहे. गावातील अनेक घरांना टाळे आहे. ज्या सोना शेखच्या घरात ८ जण मारले गेले त्यांचा शेजारी शाह आलमने सांगितले की, सोमवारी रात्री ८ वाजता मी नमाजहून आलो होतो. त्या वेळी ही घटना घडली. सोना शेख अालमचा मामेभाऊ होता.

नाव न सांगण्याच्या अटीवर गावातील लोकांनी सांगितले की, या घटनेमागे अवैध धंद्यांशी संबंधित वसुली आणि राजकीय वर्चस्वाची जुनी लढाई आहे. शाह अालम म्हणाले, तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेखसोबत सोनाचे भांडण एक वर्षापासून होते. भादू यांचा बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोनांच्या घरावर बॉम्ब फेकले. नंतर आग लावली. त्यात ८ लोक जिवंत जळाले. आश्चर्य म्हणजे हे सर्व सुरू असताना केवळ २ किमीवरील पोलिस ठाण्याला माहिती मिळाली नाही. पोलिस वेळेत पोहोचले असते तर इतकी मोठी घटना घडली नसती. पोलिसांच्या संरक्षणातच ही घटना घडल्याचा भाजपचा आरोप आहे.

घटनेनंतर अनेक तासांनी मृतदेहांची दुर्गंधीत्यांच्या समर्थकांनी सोनांच्या घरावर बॉम्ब फेकले. नंतर आग लावली. त्यात ८ लोक जिवंत जळाले. आश्चर्य म्हणजे हे सर्व सुरू असताना केवळ २ किमीवरील पोलिस ठाण्याला माहिती मिळाली नाही. पोलिस वेळेत पोहोचले असते तर इतकी मोठी घटना घडली नसती.

पोलिसांच्या संरक्षणातच ही घटना घडल्याचा भाजपचा आरोप आहे.भादूंची हत्या व जाळपोळीमागे अवैध कोळसा आणि वाळूची वसुली असल्याचे म्हटले जात आहे. भादू आणि सोना यांच्यात याच वसुलीमुळे बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. पंचायत निवडणूक जिंकल्यानंतर भादू यांचा दबदबा वाढत गेला. तृणमूलमध्ये गेल्यानंतर त्यांना पोलिस आणि राजकीय संरक्षण मिळाले. याचा वापर त्यांनी विरोधकांना दाबण्यासाठी केला.

बातम्या आणखी आहेत...