आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू आंदोलने शांत करण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची समजूत काढली जाणार आहे. यासाठी केंद्राने आठ केंद्रीय मंत्र्यांची टीम बनवली आहे. यामध्ये हरदीपसिंग पुरी, कैलास चौधरी, स्मृती इराणी, अनुराग ठाकूर, संजीव बाल्यान, सोम प्रकाश, गजेंद्रसिंह शेखावत व जितेंद्र सिंग या मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपचे महासचिव तरुण चुघ यांनी या वृत्तास दुजोरा दिला. ते म्हणाले की, ज्यांची दिशाभूल केली जात आहे, त्यांना कायद्यांचे फायदे सांगणे आमचे कर्तव्य आहे. दुसरीकडे, पक्षाच्या सूत्रांनुसार हे मंत्री १३ ते २० ऑक्टोबरपर्यंत पंजाबातील विविध भागांत दौरा करतील. तेथील शेतकरी, शेतकरी नेते, कृषी संशोधकांची भेट घेणार आहेत. पुरी १३ ऑक्टोबरला अमृतसरमध्ये शेतकऱ्यांशी चर्चा करतील. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी १५ ऑक्टोबरला भटिंडा व फरीदकोटला जातील.ठाकूर १६ ऑक्टोबरला मोगा आणि लुधियानात कृषी संशोधकांना संबोधित करतील. दरम्यान, सेव्हन स्टार ट्रॅक्टरवर बसून शेतकऱ्यांचे दु:ख समजणार नाही, अशी टीका भाजपच्या एका नेत्याने केली.
विरोधक : कर्नाटक काँग्रेस विधेयकाविरोधात घेणार २ कोटी सह्या; काँग्रेसशासित राज्यांमध्ये विशेष अधिवेशनाची तयारी
नवीन कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आपल्या आंदोलनाचा विस्तार पंजाब-हरियाणाच्या पुढे करणार आहे. काँग्रेसकडून या कायद्याविरोधात स्वाक्षरी अभियान राबवले जाणार आहे. यात २ कोटी लोकांच्या सह्या घेतल्या जातील. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन रोखत आहे. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी पुढील महिन्यात बंगळुरूत येतील. सूत्रांनुसार, काँग्रेस शासित राजस्थान व छत्तीसगडमध्ये विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाचे धरणे, केजरीवालही सहभागी
दिल्लीत जंतर-मंतरवर नवीन कृषी कायद्यांविरोधात आम आदमी पक्षाने धरणे दिले. या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील उपस्थित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.