आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Eight week Optional Calendar Issued For 9th To 12th, Curriculum For NCERT Students

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:नववी ते बारावीसाठी जारी झालेआठ आठवड्यांचे पर्यायी कॅलेंडर, एनसीईआरटीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम लागू

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या कॅलेंडरमध्ये कला, शारीरिक व्यायाम, योगासने, पूर्व व्यावसायिक कौशल्ये आदींचा समावेश

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी उच्च माध्यमिक वर्गांसाठी पर्यायी कॅलेंडर जारी केले. ते आठ आठवड्यांचे असेल. एनसीईआरटीने हे कॅलेंडर तयार केले आहे. त्यामुळे ते एनसीईआरटीचा अभ्यासक्रम असलेल्या इयत्ता नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू असेल. कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. घरून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि समाज माध्यमांचा प्रयोग करून शिक्षण देणे हा या कॅलेंडरचा उद्देश आहे.

या कॅलेंडरमध्ये कला, शारीरिक व्यायाम, योगासने, पूर्व व्यावसायिक कौशल्ये आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सारणीबद्ध रूपात वर्गनिहाय आणि विषयनिहाय उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. हे उपक्रम हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या चार विषयांशी संबंधित आहेत. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील चिंता कमी करण्याच्या रणनीतीचाही या कॅलेंडरमध्ये समावेश आहे. निशंक म्हणाले की, हे कॅलेंडर मोबाइल, रेडिओ, टीव्ही, एसएमएस व समाज माध्यमे लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे.