आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Road Accident; Driver Beaten, Eight Year Old Girl Child Killed In Alirajpur

मध्यप्रदेशात ड्रायव्हरला जिवंत जाळले:पिकअपने मुलीला चिरडले, संतप्त जमावाने पिकअपला आग लावून, त्यात ड्रायव्हरला फेकले

आलिराजपुर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशच्या अलीराजपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 8 वर्षीय मुलीला पिकअपने चिरडल्याने या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी चालकाला मारहाण करून पिकअप पेटवून दिले, इतकेच नाही तर चालकालाही देखील त्या आगीत फेकून दिले. त्यात चालक गंभीररित्या जळाला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून लोकं चालकाला मारहाण करून गाडी पेटवताना दिसत आहेत.

ड्रायव्हर हा त्याच्या घरात एकमेव कमावता होता

चालक मगन सिंग (37 वर्षे) रा. जामली जोबत यांना भाबरा येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक पाहून त्यांना गुजरातमधील दाहोद येथे रेफर करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर मगन सिंग हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.

पिकअपने 8 वर्षीय मुलीला चिरडले, यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.
पिकअपने 8 वर्षीय मुलीला चिरडले, यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री 7 ते 8 वाजेदरम्यान छोटी पोळ गावात एका पिकअपने मुलीला चिरडले. त्यानंतर ग्रामस्थांनी चालकाला मारहाण करून वाहन पेटवून दिले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त लोकांनी शांत केले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एसडीएम किरण अंजना यांनी सांगितले. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...