आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलएसी:सैन्य माघार घेईल की थंडीत डोंगरावर राहील? भारत, चीन कोअर कमांडरदरम्यान आठव्या टप्प्यात आज चर्चा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि चीनचे लष्करी कमांडर यांच्यात शुक्रवारी आठव्या टप्प्यातील बैठक होईल. भारताच्या चुशुल सीमा तळावर सकाळी साडेनऊ वाजता बैठकीला सुरुवात होईल. ती रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. एलएसीवर कडाक्याच्या थंडीच्या आधी ही बैठक खूप महत्त्वाची मानली जात आहे. जर चिनी लष्कर पेंगाँग आणि देपसांगमधून मागे न हटण्याचा निर्णय बैठकीत न झाल्यास दोन्ही लष्करांना पुढील चार महिने शून्याच्या खाली उणे २० ते ५० अंश तापमानात काढावे लागतील, हे नक्की.

भारताच्या वतीने या बैठकीत १४ कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल पी. जी. के. मेनन उपस्थित राहतील. कोअर कमांडरच्या स्थापनेआधीच ते गेल्या दोन बैठकांत सामील झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सहसचिव नवीन श्रीवास्तव हेदेखील या बैठकीत उपस्थित राहतील. चीनसोबतच्या चर्चेत अनेक गोपनीय मुद्दे आहेत आणि ते जाहीर करणे योग्य नसल्याचे संकेत कोअर कमांडरच्या या बैठकीआधी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिले होते. लष्करी सूत्रांनुसार सातव्या टप्प्यातील चर्चेत चीनच्या वतीने प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावावर लष्कर आपली भूमिका स्पष्ट करेल. दरम्यान, भारतीय लष्कराने हिवाळ्यात तैनात राहण्याची संपूर्ण तयारी केली आहे. पेंगाँगच्या दक्षिण किनाऱ्यावर कैलास रेंजच्या सर्व शिखरांवर सैनिकांसाठी थंडी व चिनी सैन्यासोबत लढण्याची पूर्ण तयारी केली आहे. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चेंडू आता चीनच्या कोर्टात आहे. २० एप्रिलच्या आधीची स्थिती कायम करण्यासाठी माघार घ्यायची आहे की नाही, याचा निर्णय पीएलएला घ्यायचा आहे. जर त्यांचे लष्कर मागे हटले नाही तर आम्ही कोणत्याही स्थितीसाठी सज्ज आहोत.

लडाखमध्ये एप्रिलपासून आतापर्यंत एलएसीवर दोन्हीकडून पन्नास-पन्नास हजार जवान तैनात आहेत आणि १६ जूनला गलवानमध्ये दोन्हींमध्ये हाणामारी झाली होती. मात्र, २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री भारतीय लष्कराच्या कैलास रेंजमध्ये सुमारे ५० शिखरांवर तैनातीनंतर चीनचे पीएलए नरमल्याचे दिसते. तेव्हापासून चिनी सेना आक्रमक झालेली नाही. कोअर कमांडरच्या २१ सप्टेंबरला सहाव्या टप्प्यातील चर्चेत जैसे थे कायम ठेवणे, एलएसीजवळ सैनिकांची संख्या न वाढवण्याच्या सहमतीवर चिनी सैन्य कायम राहिले. चर्चेवर लक्ष ठेवून असलेल्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भास्करला सांगितले की, पीएलएची भूमिका चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या निर्णयावर अवलंबून आहे. काय कारण दाखवून आपले सैन्य मागे घ्यायचे, अशी अडचण पक्षनेतृत्वासमोर आहे. त्यांना कोणतेही कारण सापडत नाही. म्हणून या टप्प्यातील चर्चेतूनही आम्हाला तणाव कमी होण्याची कोणतीही आशा दिसत नाही.