आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्वविक्रम:‘एक सलाम देश के नाम’ भास्करच्या वाचकांनी नोंदवला विश्वविक्रम

जयपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपाल मिश्र प्रमाणपत्र देत म्हणाले, हे अभियान देशाची मूळ भावना आहे

दैनिक भास्करच्या वाचकांनी ‘एक सलाम देश के नाम’ अभियानांतर्गत विश्वविक्रम नोंदवला आहे. ७ ते १० सेकंदांच्या व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून १४,३५१ वाचकांनी देशाला सलामी देत हा विश्वविक्रम नोंदवला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे अभियान राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोमवारी राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी भास्करच्या वाचकांच्या या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान केले. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड‌्सकडून हे प्रमाणपत्र दैनिक भास्करचे व्यवस्थापकीय संपादक जगदीश शर्मा व नॅशनल एडिटर लक्ष्मीप्रसाद पंत यांना मिळाले आहे.

दरम्यान, या वेळी राज्यपाल मिश्र म्हणाले की, भास्करने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवगळी अभियाने राबवली आहेत. हे अभियान देशाची मूळ भावना आहे. या अभियानात सहभागी होऊन भास्करच्या वाचकांनी देशाची एकता आणि अखंडतेची भावना बळकट केली आहे. दैनिक भास्करच्या या अभियानात सहभागी होणाऱ्या सर्व वाचकांना या विश्वविक्रमासाठी प्रमाणपत्र दिले जाईल.