आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीत एकादशीला रंगोत्सव:बाबांच्या दरबारात आनंदाची उधळण

चंदन पांडेय | वाराणसीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रज होळीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे. शुक्रवारी रंगभरी एकादशीनिमित्त ब्रजचा उंबरठा संबोधल्या जाणाऱ्या हाथरसमध्ये होळीची सुरुवात झाली. दुसरीकडे, बाबा विश्वनाथची नगरी काशीत रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. काशीत शुक्रवारी गौरा माता काशी विश्वनाथ धामस्थित स्वर्णिम गर्भगृहात पोहोचली. काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाल्यानंतर पहिल्यांदाच माता पार्वतीने गंगेचे दर्शन घेतले.

३५९ वर्षांपासून मंदिरात सुरू आहे परंपरा: अशी मान्यता आहे की, भोलेनाथ पार्वती मातेला घेऊन एकादशीच्याच दिवशी कैलास पर्वतावर आले होते. यामुळे पार्वती मातेच्या निरोपाचा दिवस काशीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गेल्या ३५९ वर्षांपासून काशी विश्वनाथ मंदिर महंत कुटुंबाने ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार रजत पालखीत महादेव हे पार्वती माता आणि गणपतीसोबत शहर भ्रमणावर निघतात. रस्त्यात भक्त गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत करतात.

बातम्या आणखी आहेत...