आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया फेब्रुवारी वसंत ऋतूची जाणीवच झाली नाही. उष्णता वाढत आहे. अनेक राज्यांत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती तयार होत आहे. विविध जागतिक मॉडेल यामागे अल निनो कारण ठरवत आहेत. नवी शक्यता अमेरिकी क्लायमेट प्रेडिक्शन एजन्सीने (एनसीईपी) व्यक्त केली आहे. यामुळे जास्त उष्णतेची लाट चालू शकते. मान्सूनवरही वाईट परिणाम होऊ शकतो. पिकांवर परिणाम होईल. त्यामुळे वीज वापर वाढेल. या वर्षी अल निनो आपल्या आयुष्यावर कसा परिणाम करणार ते जाणून घ्या...
{अल निनो काय आहे, त्याचा परिणाम कधी सुरू होईल अल निनोदरम्यान प्रशांत महासागरातील उष्ण पाणी उत्तर व दक्षिण अमेरिकेकडे पसरते आणि नंतर यामुळे संपूर्ण जगातील तापमान वाढते. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. हा बदल ९ ते १२ महिन्यांपर्यंत राहतो. अल निनोची स्थिती दर ४ ते १२ वर्षांत येते. मात्र, ती २ ते ७ वर्षांत आली आहे. याचा थेट परिणाम पावसाच्या पॅटर्नवर पडतो. सरासरी पावसाची शक्यता केवळ १०% पर्यंत असते. एनसीईपीनुसार, या वर्षी ऑगस्टपासून नोव्हेंबरपर्यंत याचा परिणाम दिसेल.
{आधीच्या अल निनोने कोणत्या अडचणी आणल्या? देशात २०१५ मध्ये अल निनोमुळे हवामानात ऑक्टोबरपर्यंत उष्ण आणि आर्द्रता राहिली. यादरम्यान २०१ दिवसांत १३३ दिवसांचे तापमान २.२ अंशापेक्षा जास्त होते. २०१९ मध्ये एप्रिल-जूनदरम्यान ९१ पैकी ६४ दिवसांचे सरासरी तापमान २.८ अंशापेक्षा जास्त होते. २०२२ मध्ये मार्चमधील भयंकर उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन २.३ कोटी टन कमी झाले. २०२३ मध्ये गव्हासह अनेक रबी पिकांमध्ये आधीच समस्या दिसत होती. अल निनोमुळे नुकसान वाढू शकते.
{अल निनोमुळे वीज मागणीवर काय परिणाम होईल ? वित्त वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत मागणी ४०,५०० कोटी युनिट होती. मात्र, पुरवठा ४०,१०० कोटी युनिट होऊ शकतो. १० जून २०२२ ला पीक डिमांडने २१२ गीगावॅटच्या सार्वकालीन स्तराला स्पर्श केला आहे. याचे कारणही उष्णता आहे. यादरम्यान ९१ पैकी ६८ दिवसांपर्यंत सरासरी तापमान सरासरीपेक्षा ३.५ अंश जास्त राहिले. देशाने १९०१ नंतर सर्वात उष्ण मार्च अनुभवला. हिवाळ्यांतही पीक डिमांडमध्ये वार्षिक १२% वाढ झाली.
{वीज मागणीबाबत सध्या काय शक्यता आहे? अल निनो घटकामुळे या वर्षी वीज मागणी वाढल्यास प्लँट लोड फॅक्टर (पीएलएफ) व वाणिज्य वीज दरही वाढेल. देशाला नव्याने वीज संकट सहन करावे लागू शकते. तज्ज्ञ संस्थांनुसार, तापमान आणि वीज वापरात यू आकाराचा संबंध असतो. सरासरी तापमानाचा वापरावर जास्त परिणाम होत नाही, मात्र जास्त तापमान वापरावर मोठा परिणाम करते. त्यामुळे २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ग्राहक आणि शेतीसंबंधित कामांत वीज वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
{उष्णता असो की हिवाळा, मागणीमध्ये वाढ होणारच २०२२ मध्ये वीज मागणीत ८.९% वाढ झाली. ही कोरोनानंतरच्या स्थितीतील सुधारणेशिवाय उष्णता आणि हिवाळा दोन्ही ऋतूतील सर्वोच्च स्थितीशी प्रेरित होती. अल निनो राहिल्यास या पुढेही दोन्ही ऋतूत मागणी वाढणार आहे. {ऊर्जा क्षेत्राची कितपत तयारी आहे? तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आगामी महिन्यांत वीजेच्या मागणीत वाए होईल. सरकार आपल्या बाजूने तयारीत गुंतले आहे. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात पुढील पाच वर्षंासाठी वीज खरेदीसाठी(४५०० मेगावॅट) टेंडर मागवले जाईल. याशिवाय वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा वित्त वर्ष २०२४ च्या पहिल्या सहामाहीच्या शिल्लक अवधीसाठी कोळशाच्या आयातीचा निर्देश चिंतेकडे इशारा करत आहेत.
--------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.