आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Elderly Couple Sues Son And Daughter in law For Grandchildren, Latest News And Update

वर्षभरात आजी-आजोबा बनवा:उत्तराखंडच्या वृद्धांचा मुलगा सूनेवर खटला; म्हणाले -"वर्षभरात नातवंड किंवा 5 कोटींची नुकसान भरपाई द्या"

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या एका वयोवृद्ध दाम्पत्याने नातवंडाच्या आग्रहासाठी आपल्या मुलावर तब्बल 5 कोटींच्या नुकसान भरपाईचा खटला दाखल केल्याचे विचित्र प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणी याचिकाकर्ते एस. आर. प्रसाद उत्तराखंडच्या एका कोर्टात म्हणाले -"आम्हाला केवळ एक नातवंड हवे आहे."

'एएनआय'च्या वृत्तानुसार, या दाम्पत्याला नातवंडाची एवढी ओढ लागली आहे की, त्यांनी यासाठी आपल्या मुलासह सूनेवर एक नातवंड किंवा 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

प्रसाद म्हणाले -"मुलाचे शिक्षण व अमेरिकेतील त्याच्या प्रशिक्षणासाठी व्यवस्था केल्यानंतर आमच्याकडे छदामही उरला नाही." वृतसंस्थेने प्रसाद यांचा दाखला देत म्हटले आहे की, "आम्ही नातवंडाच्या आशेने मुलाचे 2016 मध्ये लग्न लावून दिले. नात होवो की नातू आम्हाला त्याची कोणतीही चिंता नाही. आम्हाला केवळ बाळ हवे होते."

ते म्हणाले -"मी मुलाला माझा संपूर्ण पैसा लावला. त्याला अमेरिकेत प्रशिक्षण दिले. आता माझ्याकडे छदामही उरले नाही. आम्ही घर बांधण्यासाठी बँकेकडून कर्जही घेतले आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या प्रचंड संकटांत आहोत. आम्ही आमच्या याचिकेत मुलगा व सूनेकडून प्रत्येकी अडीच कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे."

प्रसाद यांच्या वकिलांनी त्यांच्या मुलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेत हे प्रकरण "समाजातील कटू सत्य" असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले -"आपण आपल्या मुलांवर मोठी गुंतवणूक करुन त्यांना चांगल्या कंपनीत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करतो. पण, त्यानंतर मुले आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करतात. मुलांवर आपल्या पालकांची आर्थिक जबाबदारी असते याचा विसर त्यांना पडतो. प्रस्तुत प्रकरणात आई-वडिलांनी एका वर्षात नातवंड किंवा मुलगा व सूनेकडून 5 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे."

बातम्या आणखी आहेत...