आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Elderly Man Beaten To Death By His Son And Daughter In Law, Latest News And Update

VIDEO:निर्दयी लेक व सूनेच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू:खांबाला बांधून केली बेदम मारहाण, ओडिशातील संतापजनक घटना

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाच्या कोरापूट जिल्ह्यातील एका आदिवासी गावात शुक्रवारी एका वृद्धाची त्याच्याच कुटुंबियांनी बेदम मारहाण करून हत्या केली. कुर्शा मनियाका नामक या वृद्धाला वीजेच्या खांबाला बांधून लाकडाने मारहाण करण्यात आली होती. घरच्यांशी वाद झाल्यानंतर वृद्धाने रागाच्या भरात घराच्या छतावर असणारी एक सीमेंटची शिट फोडली होती. एवढाच त्यांचा दोष होता.

सीमेंटची शिट फोडल्यामुळे संतप्त झालेल्या वृद्धाचा भाऊ, मुलगा व सूनेने त्याला वीजेच्या खांबाला बांधले व लाकडाने बेदम मारहाण सुरू केली. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरला झाला आहे.

मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

व्हिडिओत वृद्धाला वीजेच्या खांबाला बांधून लाकडाने निर्दयीने मारहाण करण्यात येत असल्याचे व तो जिवाच्या आकांताने ओरडत असल्याचे दिसून येत आहे. पण त्यानंतरही त्याला वाचवण्यासाठी कुणीही येत नाही. या मारहाणीमुळे वृद्धाचा बांधलेल्या स्थितीतच मृत्यू झाला.

2 आरोपी फरार

वृद्धाच्या मृत्यूनंतर आरोपींनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पण गावातीलच काही लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी 2 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...