आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Elderly Man Who Slips On The Side Of The Road And Is Swept Into A Deep Ditch; Watch The Heart pounding Video

रस्त्याच्या कडेला घसरला पाय:खोल गटारात वाहून गेली वृद्ध व्यक्ती; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. अशा स्थितीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, त्याचवेळी या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याबाबतीत अनेक समस्याही आहेत. सध्या अशाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात पडतो आणि त्यानंतर पुढे काय झाले यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पाहा व्हि़डिओ.

या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध व्यक्तीला कोणी एका व्यक्तीने रस्त्यावर सोडून दिले. पावसामुळे रस्त्यावर भरपूर पाणी होते. आणि ही वृद्ध व्यक्तीने जेव्हा पाण्यात पाय ठेवला तेव्हा त्यांच्या पाय घरसल्यामुळे ते रस्त्यालगतच्या नाल्यात पडले. आणि वाहून गेले. काही सेकंदासाठी ही वृद्ध व्यक्ती गायब झाली व आजूबाजूचे लोक या वृद्ध व्यक्तीला वाचवण्यासाठी पुढे आले.

दरम्यान काही लोक नाल्याच्या उजव्या बाजूला तर काही लोक डावीकडे पाहू लागले. पण वृद्ध व्यक्ती कुठेच दिसत नव्हती. परंतु, एका व्यक्तीने प्रवाहाच्या दिशेने नाल्यात हात टाकताच वृद्ध व्यक्ती सापडली. त्यांचा हात पकडून त्यांना लगेचच बाहेर काढण्यात आले. मात्र, वृद्धाला बाहेर काढले असता ते बेशुद्ध अवस्थेत होते. कोच_मंजुनाथ_किकबॉक्सर नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. वृद्धाचे प्राण वाचवल्याबद्दल लोकांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...