आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election 2022 । Assembly । Uttar Pradesh । Will RLD Form An Alliance With The Congress And Not With The Samajwadi Party?

मिशन विधानसभा 2022:उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पार्श्वभुमीवर राजकीय भेटीगाठी सुरू, समाजवादी पार्टीसोबत नाही तर काँग्रेससोबत युती करणार रालोद?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी रालोदचे अध्यक्ष चौधरी जयंत सिंह यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने जयंत सिंह यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीत काही जागा आणि राज्यसभा खासदार करणार असे आश्वासन दिले आहे.

तर तिकडे रालोदचे म्हणणे आहे की, बसपा आणि काँग्रेसची युती होणे कठीण आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवार सांगितले होते की, आमचे रालोदसोबत युती आहे आणि पुढेही राहणार. फक्त जागांबाबत चर्चा करणे बाकी आहे. असे यादव म्हणाले होते. त्यानंतर रालोदचे प्रमुख चौधरी यांनी देखील हेच वक्तव्य केले होते.

मात्र दिल्लीतून परतत असतांना ज्या फ्लाइटमध्ये अखिलेश बसले होते. त्यात न बसण्याचा निर्णय चौधरी यांनी घेतला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या खाजगी विमानातून प्रवास केले ज्यात प्रियंका गांधी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि खासदार दीपेंद्र हुड्डा होते. याआधी लखनऊच्या विमानतळावरच चौधरी यांनी प्रियंका गांधींसोबत बऱ्याच वेळ चर्चा केली होती. त्यात काँग्रेसने चौधरी यांनी ऑफर दिल्याचे देखील बोलले जात आहे.

युपीसह पंजाब राज्यात देखील विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने, रालोदला पंजाबमध्ये काँग्रेस काही जागा लढण्यासाठी देणार आहे. सोबत छत्तीसगढ किंवा पंजाबच्या नेतृत्वाखाली राज्यसभेत पाठवार असल्याची देखील ऑफर काँग्रेसकडू त्यांना देण्यात आली आहे. इतकेच नाही तर हरियाणात देखील मिळून समीकरण तयार करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रस्तावावर विचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसकडून मिळालेल्या प्रस्तावावर रालोद विचार करत आहे. मात्र काँग्रेस बसपा सोबत देखील संपर्कात आहे. बसपा, रालोद आणि काँग्रेस जर सोबत आले तर एक मजबूत पार्टी होऊ शकते. यावर बसपा देखील मान्य असल्याची माहिती आहे. कारण बसपाला अनेक जण सोडचिठ्ठी देत आहे.

बातम्या आणखी आहेत...