आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनात पहिली निवडणूक:‘ईव्हीएम’चे बटण दाबण्यासाठी हातमोजे, उमेदवार ऑनलाइन भरतील उमेदवारी अर्ज; घरोघर प्रचार करण्यासाठी फक्त 5 समर्थकांना असेल परवानगी

नवी दिल्ली/ पाटणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात कसे हाेईल मतदान-निवडणूक प्रचार? निवडणूक आयोगाचे मार्गदर्शनपर निर्देश जाहीर, काटेकोर अंमलबजावणीही

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम घुमू लागले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने शुक्रवारी यासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार कोरोना काळातील ही पहिली निवडणूक असल्याने मतदार, उमेदवार, अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळे निर्देश आहेत. यात मतदारांसाठी पोलिंग बूथवर ईव्हीएमचे बटण दाबण्यासाठी व स्वाक्षरी करण्यासाठी ग्लोव्हज दिले जातील. बूथमध्ये प्रवेशापूर्वी प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग होईल. उमेदवार आपले अर्ज, अनामत रक्कम इत्यादी ऑनलाइन भरता येईल. त्याची प्रिंट काढून ती रिटर्निंग ऑफिसरकडे सोपवता येईल. एवढेच नव्हे तर घरोघर प्रचारासाठी फक्त पाच समर्थकांनाच परवानगी असेल. आयोगाने राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांकडून कोरोना काळात निवडणूक घेण्याबाबत सूचना मागवल्या होत्या.

कुणासाठी काय निर्देश? : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शेवटच्या तासात किंवा टपालाने मतदान करू शकतील, अंगात ताप अधिक असेल तर सर्वात शेवटी.

मतदारांसाठी निर्देश

> मतदारांना ईव्हीएम बटण दाबण्यासाठी आणि मतदार नोंदणी वहीत स्वाक्षरी करताना हातमोजे दिले जातील. ते शक्यतो डिस्पोझल असतील.

> क्वाॅरंटाइन कोविड-१९ रुग्ण शेवटच्या तासात मतदान करू शकतील.

> कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी वेगळे निर्देश असतील.

> मतदारांना ओळख पटवण्यासाठी आपला मास्क नाकाखाली घ्यावा लागेल.

उमेदवारांसाठी निर्देश

> उमेदवार आपला अर्ज, शपथपत्र आणि अनामत रक्कम ऑनलाइन जमा करू शकतात. त्याची प्रिंट रिटर्निंग ऑफिसरला द्यावी लागेल.

> उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारासोबत २ व्यक्ती आणि दोनच वाहने नेता येतील.

> घरोघर प्रचाराच्या वेळी उमेदवारासोबत पाच व्यक्तीच जाऊ शकतील. यात सुरक्षा जवानांचा समावेश नाही.

> जाहीर सभा आणि रोड शोची परवानगी गृह मंत्रालय तसेच राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले तरच मिळेल.

> रोड शोमध्ये दर पाच वाहनांनंतर अंतर ठेवावे लागेल. यात सुरक्षा वाहनांचाही समावेश आहे. आतापर्यंत ही संख्या १० अशी होती.

> जाहीर सभा व प्रचार फेऱ्या काेविड-१९च्या निर्देशांनुसारच होऊ शकतील.

> जिल्हा निवडणूक अधिकारी सभांसाठी मैदाने ठरवतील. तेथे येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग असतील. मैदानावर फिजिकल डिस्टन्सिंगसाठी मार्किंग असेल.

मतदान केंद्रांसाठी निर्देश

> मतदानापूर्वी एक दिवस केंद्र सॅनिटाइझ केले जाईल. येथे प्रवेश व बाहेर पडताना साबण, पाणी आणि सॅनिटायझर असेल.

> प्रत्येक केंद्राबाहेर मतदारांचे थर्मल स्क्रीनिंग होईल. मतदान कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ किंवा आशा कर्मचारी हे काम करतील. दोन वेळा तपासणीनंतर शरीराचे तापमान अधिक वाटले तर मतदारास पोलचिट देऊन मतदानासाठी शेवटच्या तासात येण्यास सांगितले जाईल.

> एका बूथवर १ हजार लोक मतदान करू शकतील. पूर्वी ही संख्या १५०० होती.

> ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसंबंधी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही हातमोजे दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...