आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Commission's Proposal To Increase Cash Expenditure For Election Campaign From Rs 10,000 To Rs 2,000

पारदर्शकतेसाठी निवडणूक आयोगाचा प्रस्ताव:निवडणूक प्रचारासाठी रोख खर्चाची रक्कम 10 वरून 2 हजार करणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकांमधील रोख रकमेच्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता आणखी एक प्रस्ताव दिला आहे. विद्यमान निवडणुक आचारसंहितेनुसार उमेदवाराला १० हजारपर्यंत रोख रक्कम खर्च करण्यास मुभा होती ती आता घटवून २ हजार रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. निवडणुकीत अधिक पारदर्शकता यावी यासाठी आयोगाने केंद्र सरकारला हा प्रस्ताव पाठवला आहे.

निवडणूक प्रचारासाठी एखाद्या व्यक्तीला अथवा आस्थापना, कंपनीला केवळ २ हजारांपर्यंतच रक्कम रोख देता येऊ शकेल. त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास ती अकाउंट पेयी चेक अथवा ऑनलाइन किंवा डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून करावी, अशी सुधारण निवडणूक नियमांमध्ये करावी, असा प्रस्ताव आयोगाने केंद्राला दिला आहे. निवडणुकीतील गैरप्रकार घटवण्याच्या दृष्टीने ही दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. विद्यमान नियमांनुसार उमेदवाराला १० हजारांपर्यंतची रक्कम रोख स्वरूपात खर्च करता येऊ शकत होती.

गुजरात निवडणुकीवर बारीक लक्ष गुजरात निवडणुकीत आयोगाने भरारी पथके आणि निगराणी पथकांना खास निर्देश दिले आहेत. प्रचार मोहिमांवर होणारा अवाजवी खर्च, पैशांचे वाटप तसेच शस्त्रे, मद्य, दारूगोळा यांच्या अवैध वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...