आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिवडणूक आयोगाने 12 राज्यातील 14 विधासनभा आणि 2 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. या सर्व ठिकाणी 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून, 15 दिवसानंतर म्हणजेच, 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. यात, महाराष्ट्रातील पंढरपूर मतदारसंघासाठीही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे.
भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन
पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि उपचारादरम्यान पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.
कुठे किती जागांसाठी पोटनिवडणूक
विधानसभा
महाराष्ट्र (1 जागा) : पंढरपूर
राजस्थान (3 जागा) : सहारा, सुजानगड आणि राजसमंद
मध्य प्रदेश (1 जागा) : दमोह
गुजरात (1 जागा) : मोरवा हदफ
उत्तराखंड (1 जागा) : सल्ट
झारखंड (1 जागा) : मधुपूर
कर्नाटक (2 जागा) : बसवकल्याण आणि मस्की
मिजोरम (1 जागा) : सेरछिप
नागालंड (1 जागा) : नोकसेन
ओडिशा (1 जागा) : पिपिली
तेलंगाणा (1 जागा) : नागार्जुन सागर
लोकसभा
आंध्र प्रदेश (1 जागा) : तिरुपती
कर्नाटक (1 जागा) : बेळगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.