आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Election Day : Voting In 94 Seats In Bihar, By elections In 54 Seats In 10 States; The United States Will Have A President Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज निवडणूकवार!:बिहारमध्ये 94 जागांवर मतदान, 10 राज्यांत 54 जागी पोटनिवडणूक; अमेरिकेत आज ठरणार राष्ट्राध्यक्ष

वॉशिंग्टन/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा, तेजप्रताप-तेजस्वी यांची प्रतिष्ठा पणाला
  • एमपीत सर्वाधिक 28 जागांवर पोटनिवडणूक. निकाल ठरवणार शिवराजसिंह सरकारचे भवितव्य

निवडणुकांच्या इतिहासात मंगळवारचा दिवस अत्यंत खास ठरेल. जगातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाहीत एकाच वेळी निवडणुकीची रणधुमाळी रंगण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत मतदानाचा मंगळवारी शेवटचा दिवस. विविध राज्यांत मतदानाची वेळ वेगळी असली तरीही भारतीय वेळेनुसार बुधवार पहाटेपर्यंत मतदान सुरू असेल.

दुसरीकडे, जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजेच भारतात बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान तसेच इतर १० राज्यांत ५४ जागांवरील पोटनिवडणुकाही मंगळवारी होत आहेत. यात सर्वाधिक मध्य प्रदेशातील २८ जागांवर मतदान होत आहे. बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात १७ जिल्ह्यांतील ९४ मतदारसंघांत मतदान होईल. यात २.८५ कोटी मतदार १,४६३ उमेदवारांचे भाग्य ठरवतील. सर्वाधिक २७ उमेदवार महाराजगंजमध्ये आहेत. दरौलीत सर्वात कमी ४ उमेदवार आहेत. सर्व पोटनिवडणुका व बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबरलाच लागेल.

१२ राज्यांत बायडेन यांना ६ टक्क्यांची आघाडी... ट्रम्प म्हणाले, अंतिम मुदतीनंतरही मतपत्रिका स्वीकारण्याच्या निर्णयाला देणार आव्हान

एक्झिट पोल : बायडेन यांच्या बाजूने ५२% तर ट्रम्प यांना ४२% पाठिंबा

ताज्या सर्वेक्षणात बायडेन यांनी १० % मतांची आघाडी घेतली आहे. एनबीसी व वाॅल स्ट्रीट जर्नलच्या सर्वेक्षणानुसार, बायडेन यांना ५२ %, तर ट्रम्प यांना ४२ % पाठिंबा मिळाला. १२ राज्यांपैकी अॅरिझाेना, फ्लोरिडा, जॉर्जिया, लोव्हा, मेन, मिशिगन, मिनेसोटा, नॉर्थ कॅरोलिना, न्यू हॅम्पशायर, नेवादा, पेन्सिल्वेनिया व व्हिस्काॅनमध्ये बायडेन ६% नी आघाडीवर आहेत.

या युगात मतदानानंतरही त्वरित निकाल न मिळणे वाईट : ट्रम्प

कल आल्यानंतर आपण विजयाची घोषणा करू, या वृत्ताचे ट्रम्प यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, ‘मतदानानंतरही टपाली मतपत्रिका स्वीकारण्याच्या निर्णयाला आव्हान देऊ. या युगातही मतदानानंतर लगेच निकाल न मिळणेे वाईट आहे.’ न्यायालयाने निवडणुकीच्या ३ दिवसांपर्यंत मतपत्रिका स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.

निकालानंतर हिंसाचाराची शक्यता, पोलिसांच्या रजा रद्द

> तोडफोडीच्या शक्यतेमुळे पोलिसांनी वाॅशिंग्टनमध्ये सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

> वॉशिंग्टन डीसीमध्ये सर्वच दुकानदारांनी खिडक्या फ्लायवूडने झाकल्या आहेत. अनेक दुकानदारांनी बॅरियर लावले आहेत.

> व्हाइट हाऊसच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शिकागाे आणि न्यूयाॅर्कमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे.

बिहार : निवडणुकीचा सर्वात मोठा टप्पा, तेजप्रताप-तेजस्वी यांची प्रतिष्ठा पणाला

बिहार विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा जागांच्या हिशेबाने सर्वात मोठा टप्पा आहे. या टप्प्यात ९४ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत या ९४ पैकी एक तृतीयांश जागा राजदने जिंकल्या होत्या. जेडीयूला ३०, तर एनडीएला २२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ७ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, नंतर नितीश राष्ट्रीय लोकशाही आघाडीत गेले. याच टप्प्यात महाआघाडीतर्फे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव आणि त्यांचे भाऊ, माजी मंत्री तेजप्रताप यादव यांच्यासह अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य निश्चित होणार आहे. तेजस्वी राघोपूर मतदारसंघातून आणि तेजप्रताप हसनपुरा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील २४३ पैकी उर्वरित ७८ जागांवर ७ नोव्हेंबरला मतदान होईल.

> 34% उमेदवार आहेत कोट्यधीश, १.७२ कोटी रुपये आहे त्यांची सरासरी संपत्ती.

> 27% उमेदवार असे आहेत ज्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हेगारी प्रकरणांची आहे नोंद.

> 34% उमेदवार असे आहेत ज्यांच्याविरोधात गुन्हेगारी प्रकरणे नोंद आहेत.

एमपी : २८ जागी पोटनिवडणूक, शिवराजसिंह यांचे भविष्य ठरणार

पोटनिवडणुकीत सर्वाधिक १९ जिल्ह्यांतील २८ जागा मध्य प्रदेशात आहेत. येथे ३५५ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा मार्चमध्ये सिंधिया गटातील आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या पोटनिवडणुका घेतल्या जात आहेत. शिवराज सरकार तरणार की पुन्हा कमलनाथ सत्तेत येणार, हे या पोटनिवडणुकांचे निकाल ठरवतील.

> येथेही पोटनिवडणुका : गुजरातेत ८, उत्तर प्रदेशात ७, कर्नाटक, ओडिशा, झारखंड व नागालँडमध्ये प्रत्येकी दोन, तर तेलंगण, छत्तीसगड व हरियाणात प्रत्येकी एका मतदारसंघात मंगळवारी मतदान होत आहे.