आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Duty Performed By A Daughter Miral Vyas Who Replaces A Critically Ill Father With A Class IV Employee

राजकोट:चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या गंभीर आजारी वडिलांच्या जागी सीए करणाऱ्या मुलीने केली इलेक्शन ड्यूटी; हायकोर्टानेही केले कौतुक

राजकोट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवडणूक ड्यूटीपासून पळ काढू पाहणाऱ्यांचे अर्ज फेटाळत गुजरात हायकोर्टाने दिले मिरलचे उदाहरण

सामान्यत: निवडणूक ड्यूटीपासून वाचण्यासाठी वेगवेगळे डावपेच आणि जुगाड करण्याच्या पद्धतीच चर्चेच्या विषय ठरतात. पण गुजरात हायकोर्टाने एका अशा विद्यार्थिनीच्या भावनेला सलाम केला आहे, जी वडील गंभीर आजारी असल्याने त्यांच्या जागी निवडणूक ड्यूटी करण्यास गेली होती. एका बँकेच्या कर्मचाऱ्यांनी निवडणूक ड्यूटीत सूट मिळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्ट सुनावणी करत होते. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या पीठाने आपल्या आदेशात या मुलीने घालून दिलेल्या उदाहरणाचा सविस्तर उल्लेख करून मिरलला सलाम करत असल्याचे म्हटले आहे.

ही घटना गुजरातमधील पंचायत निवडणुकीच्या वेळची आहे. वांकानेरच्या मिरलचे वडील जयेशभाई व्यास चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. निवडणुकीत एका केंद्रावर जयेशभाईंची ड्यूटी लागली होती. ड्यूटीच्या दिवशी त्यांची तब्येत अचानक बिघडली. छातीत वेदना होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. जयेशभाई ड्यूटीवर जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांची मुलगी मिरलने (२२) वडिलांच्या जागी ड्यूटी करण्याची परवानगी मागितली. सीएची विद्यार्थिनी असलेल्या मिरलला निवडणूक ड्यूटीचे महत्त्व माहीत होते. त्यामुळे ती पीठासीन अधिकाऱ्याला भेटली. अधिकारी मिरलचा हा प्रस्ताव ऐकून थक्क झाला. त्याने मिरलला वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले. प्रकरण नायब तहसीलदार पंकजदान गढवींपर्यंत गेले. गढवींनी तिला सांगितले, ‘चिंता करू नका. आम्ही पर्यायी व्यवस्था करू शकतो. तुम्ही वडिलांची काळजी घ्या.’ पण मिरलने ड्यूटी करणार, असे म्हटले. अधिकाऱ्याने विचारले, ‘तू काय करतेस, कुठपर्यंत शिकली आहेस?’ मिरलने म्हटले,‘मी सीए फायनल इयरला आहे.’ बऱ्याच वेळ समजावल्यानंतरही मिरलने ऐकले नाही तेव्हा अधिकाऱ्यांनी तिला महिका येथील केंद्रावर ड्यूटी देऊन ओळखपत्रही दिले. हायकोर्टाने निवडणूक ड्यूटीबाबत दाखल याचिकेत मिरलच्या उदाहरणाचा उल्लेख केला तसेच ड्यूटीपासून सूट मागणाऱ्यांचे अर्ज फेटाळले.

भविष्यात अशी याचिका असेल तर वडील-मुलीच्या या घटनेचा उल्लेख करावा
कोर्टाने आदेशात संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या टिप्पणीचा उल्लेख केला. त्याने म्हटले होते,‘ या घटनेमुळे माझ्या डोळ्यांत अश्रू आले, या मुलीचा अभिमान वाटतो. कर्तव्य काय आहे, कुठलेही काम लहान-मोठे नसते, हे या मुलीला लहान वयात कळले. अशी मुलगी मिळाल्याने मिरलचे आई-वडील धन्य आहेत.’ तिच्या या भावनेमुळे प्रभावित होऊन अधिकाऱ्याने ड्यूटीस मंजुरी दिली. कोर्टाने म्हटले की, मिरलला आम्ही सलाम करतो. अशी घटना कधीतरीच घडते. भविष्यात अशी याचिका असेल तर मिरल आणि तिच्या वडिलांच्या या घटनेचा उल्लेख करावा.

बातम्या आणखी आहेत...