आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Election Results Punjab Uttarakhand Manipur LIVE Update; Navjot Sidhu Arvind Kejriwal | Assembly Election Marathi News

कॅप्टन यांची विकेट:आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून झटका; भगवंत मान यांचा 45 हजारांनी विजय, काँग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भुषवलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा या निवडणुकीत धक्कादायकरित्या 13 हजार मतांनी पराभव झाला आहे. पातियाळा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नवखे अजित पाल सिंह कोहली यांनी त्यांचा पराभव केला आहे. तर, आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी 45 हजार मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे पुढे काही दिवसांतच ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत.

दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यासह माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल, काँग्रेसचे प्रभारी नवज्योतसिंह सिद्धू यांनादेखील या निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपसोबत युती करून ही निवडणूक लढवणारे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पराभवाने सर्वांनाच चकित केले. त्यांचेदेखील आपच्या झाडूसमोर काहीच चालले नाही. तर, भाजपलाही या युतीचा काहीच फायदा झाल्याचे दिसले नाही.

कोण आहेत कॅप्टन अमरिंदर सिंह?
- कॅप्टन अमरिंदर सिंह हे पातियाळाच्या पुर्वीच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. त्यांनी लष्करातही सेवा बजावली आहे. त्यामुळे ते कॅप्टन अमरिंदर सिंह या नावानेच ओळखले जातात. विशेष म्हणजे 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांनी सेवा बजावली आहे.
- 1965 मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन यांनी सक्रीय राजकारणात सहभागी होत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
- 1984 मध्ये काँग्रेसने ऑपरेशन ब्लु स्टार राबवल्याने त्याविरोधात कॅप्टन यांनी राजीनामा देत शिरोमणी अकाली दलामध्ये प्रवेश केला होता. मात्र, नंतर 1992 मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले.
- 2002 मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पहिल्यांदा काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भूषवले होते. त्यानंतर 2017 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले होते.

नवज्योतसिंग सिद्धूसोबत वाद

  • सप्टेंबर 2021 मध्ये पंजाब काँग्रेसमधील बंडाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांची विकेट घेतली होती. अंतर्गत वादामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला होता.
  • काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढू लागला होता. एकीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धू हा संघर्ष महत्त्वाकांक्षेची लढाई म्हणून चर्चिला गेला.
  • विधानसभा निवडणुकांच्या बरोब्बर सहा महिने आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे कॅप्टनविरुद्ध बंडाचे नेतृत्व करताना दिसले. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहून कॅप्टनला हटवण्याची मागणी केली होती.
  • वादामुळे काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी पंजाब लोक काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. भाजपने या पक्षासोबत युती करून ही निवडणूक लढवली. मात्र, त्यात दोघांनाही काहीही फायदा झाला नाही. उलट आपने बाजी मारली.
बातम्या आणखी आहेत...