आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Elections Dates : West Bengal Tamil Nadu Puducherry Election Date 2021 Announcement Update | Election Commission Press Conference Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर:पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान; 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात, सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी होणार जाहीर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तमिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल

देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, आसाम आणि पुडुचेरीमध्ये निवडणुका होतील. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात निवडणुका होणार आहे. याशिवाय, असाममध्ये 3 टप्प्यात, तमिळनाडू , केरळमध्ये आणि पद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात निवडणूक होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला होईल आणि सर्व राज्यांचा निकाल 2 मे रोजी जाहीर होईल.

बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा

जागा: 30 (पुरुलिया, बांकुड़ा, झाड़ग्राम, पश्चिम मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर)

अधिसूचना: 2 मार्च

अर्ज भरणे: 9 मार्च

अर्ज मागे घेणे: 12 मार्च

मतदान: 27 मार्च

मतमोजणी: 2 मे

दुसरा टप्पा

जागा: 30 (बांकुड़ा, पश्चिमी मेदिनीपुर, पूर्व मेदिनीपुर, दक्षिण-24 परगना)

अधिसूचना: 5 मार्च

अर्ज भरणे: 12 मार्च

नाव परत घेणे: 17 मार्च

मतदान: 1 एप्रिल

तिसरा टप्पा

जागा: 31

अधिसूचना: 12मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

चौथा टप्पा

जागा: 44

अधिसूचना: 16 मार्च

अर्ज भरणे: 23 मार्च

नाव परत घेणे: 26 मार्च

मतदान: 10 एप्रिल

पाचवा टप्पा

जागा: 45

अधिसूचना: 23 मार्च

अर्ज भरणे: 30 मार्च

नाव परत घेणे: 3 एप्रिल

मतदान: 17 एप्रिल

सहावा टप्पा

जागा: 43

अधिसूचना: 26 मार्च

अर्ज भरणे: 3 एप्रिल

अर्ज परत घेणे: 7 एप्रिल

मतदान: 22 एप्रिल

सातवा टप्पा

जागा: 36

अधिसूचना: 31 मार्च

अर्ज करणे: 7 एप्रिल

अर्ज परत घेणे: 12 एप्रिल

मतदान: 26 एप्रिल

आठवा टप्पा

जागा: 35

अधिसूचना: 31 मार्च

अर्ज भरणे: 7 एप्रिल

नाव परत घेणे: 12 एप्रिल

मतदान: 29 एप्रिल

आसाममधील निवडणुकीच्या तारखा

पहिला टप्पा

जागा: 47

अधिसूचना: 2 मार्च

अर्ज भरणे: 9 मार्च

नाव परत घेण्यासाठी: 12 मार्च

मतदान: 27 मार्च

मत मोजणी: 2 मे

दुसरा टप्पा

जागा: 39

अधिसूचना: 5 मार्च

अर्ज भरणे: 10 मार्च

अर्ज परत घेणे: 17 मार्च

मतदान: 1 एप्रिल

तिसरा टप्पा

जागा: 40

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

केरळमध्ये एका टप्प्यात मतदान होईल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

नाव परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

तमिळनाडुत एका टप्प्यात मतदान होईल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

नाव परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

पुडुचेरीचा शेड्यूल

अधिसूचना: 12 मार्च

अर्ज भरणे: 19 मार्च

अर्ज परत घेणे: 22 मार्च

मतदान: 6 एप्रिल

निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की, 'मागच्या वर्षी सर्व जगासमोर कोरोनाचे संकट उभे होते, तेव्हा जगभरातील निवडणूक आयोगांसमोर निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान होते. अनेक देशांनी अशा परिस्थिती हिम्मत दाखवली आणि सर्व नियमांचे पालन करुन निवडणुका घेतल्या. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 18 जागांवर जून 2020 मध्ये निवडणुका घेऊन सुरुवात केली. आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बिहारचे होते. तिथे 7.3 कोटी मतदानर होते. ती आमच्यासाठी अग्निपरीक्षा होती.'

अरोरा पुढे म्हणाले की, 'मला सांगताना आनंद होतो की, बिहारच्या मतदारांनी विश्वास दाखवला आणि निवडणुकीत सहभाग नोंदवला. बिहारमध्ये अनेक अधिकाऱ्यांना कोरोना झाला होता, तरीदेखील निवडणुकीची तयारी केली. बिहारमध्ये 57.3% मतदान झाले, जे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त आहे.'

ते पुढे म्हणाले की, '80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, अपंग आणि इतर महत्वाच्या नोकऱ्यांमध्ये असलेले लोकांना पोस्ट बॅलेटद्वारे मतदान करता येईल. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचे लसीकरण होईल. याशिवाय, मतदान करण्यासाठी 1 तास वाढून दिला जाईल. 5 राज्यांमधील 824 जागांसाठी निवडणूक होईल. यासाठी 18.68 कटो मतदार असून, त्यांच्यासाठी 2.7 लाख मतदान केंद्र असतील.

'18.68 कोटी मतदारांसाठी 2.7 लाख मतदान केंद्र'

आरोरा पुढे म्हणाले की, 'असाम विधानसभेचा कार्यकाळ 31 मेपर्यंत आहे. याचप्रकारे तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 24 मे, बंगालचा 30 मे, केरळचा 1 जून आणि पुडुचेरीचा 8 जूनपर्यंत आहे. 824 विधानसभा जागांसाठी 18.68 कोटी मतदार असतील आणि 2.7 लाख मतदान केंद्र बनवले जातील. तमिळनाडूमध्ये 66 हजार, असाममध्ये 33 हजार, बंगालमध्ये 1 लाख 1 हजार 916 मतदान केंद्र असतील.'

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल विरुद्ध भाजप
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला तब्बल 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे आणि काँग्रेस आघाडीला 76 जागा मिळाल्या होत्या. केवळ 3 जागा मिळवणाऱ्या भाजपने यावेळी मात्र पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ताच स्थापन करू असे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दरवेळी डावे विरुद्ध तृणमूल पाहायला मिळत होते. भाजपला यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र ही निवडणूक भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंगली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्यात आघाडी शक्य आहे. फुरफुरा शरीफ यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटला 30 जागा दिल्या जाणार अशीही चर्चा आहे.

आसामात 126 जागांवर निवडणूक
2016 च्या निवडणुकीत या ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली. भाजपला 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26, AIUDF ला 13 जागा आणि इतरास एक जागा मिळाली होती.

तामिळनाडूत 234 जागांवर चुरस
तामिळनाडूत 134 जागांवर विजय मिळवून AIDMK (अन्ना द्रमुक) आघाडी सत्ता स्थापित केली. गठबंधन ने सरकार बनाई थी। DMK (द्रमुक) आणि काँग्रेस आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या.

केरळमध्ये 140 जागांवर लढत
देशात एकमेव राज्य केरळमध्ये डाव्यांची सत्ता आहे. केरळमध्ये सध्या डाव्यांच्या 91 आणि काँग्रेसच्या 47 जागा आहेत. भाजपच्या आणि इतर एका पक्षाला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली होती.

पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक
केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीत 30 जागांवर निवडणूक होणार आहे. तर येथे 3 जागा नामनिर्देशित असतात. या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेस आघाडीची सत्ता होती. पण, गेल्या आठवड्यात निवडणुकीच्या तोंडावर अनेक आमदारांनी काँग्रेस सोडल्याने सरकार अल्पमतात आले. परिणामी मुख्यमंत्री नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. सध्या पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट आहे.

बातम्या आणखी आहेत...