आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक हाेईल. मतदारसंघ फेररचना आयाेगाकडून अहवाल मिळाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर हाेतील. आयाेगाचा कार्यकाळ ६ मार्च २०२२ मध्ये संपणार आहे. त्यामुळेनिवडणूक तीन महिने लांबणीवर पडेल. निवडणूक यंदा अमरनाथ यात्रेनंतर हाेऊ शकते. निवडणुकीपू्र्वी राजकीय चित्र बदलू शकते. कारण आयाेग मतदारसंघ फेररचनेवर लाेकांची मते मागवत आहे. त्यानंतर मसुदा दुरुस्तीसह अंतिम करून ताे जाहीर केला जाईल. या मसुद्याद्वारे शक्ती संतुलन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काश्मीरमध्ये फेररचनेनंतर मतदारसंघांची संख्या ८३ वरून ९० करण्याचा प्रस्ताव आहे. त्यात जम्मूला ४३ व काश्मीरला ४७ जागा देण्याचा प्रस्ताव आहे.
आयाेगाने सहा अतिरिक्त मतदारसंघ काश्मीरमध्ये, तर जम्मूत एक मतदारसंघ वाढवण्याची शिफारस केली आहे. त्यापैकी साेळा जागा अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी असतील. या प्रस्तावावरून सर्वच पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. त्यांनी तयारी सुरू केली आहे.भाजपने ‘हाॅट सीट’वर पहिला हिंदू मुख्यमंत्री देण्याची विषयपत्रिका तयार केली आहे. राज्यातील ५० जागी विजय मिळवून सत्ता मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. संवेदनशील मतदारसंघात संयुक्त उमेदवार देण्याविषयी इतर पक्षही सहमत झाले आहेत.
भाजप कार्यालयात मसुदा केला : काँग्रेस
नॅशनल कॉन्फरन्सने मतदारसंघ फेररचना आयोगावर प्रश्नचिन्ह लावले आहे. प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांनी मसुदा भाजप कार्यालयात बसून तयार केल्याचा आरोप केला. त्यावर भाजप प्रमुख रविंदर रैना म्हणाले, कार्यकर्ते, जनतेच्या आक्षेपांवर लक्ष देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.