आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:काश्मीरमध्ये विकासावर निवडणूक, पण कलम ३७० ची घोषणाही पुढे, केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर आज निवडणूक

श्रीनगर | हारुण रशीद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र श्रीनगरमध्ये पीडीपी नेता महबूबा मुफ्ती यांच्या घराबाहेरचे आहे. निवडणुकीच्या आधी सुरक्षा वाढवली आहे - Divya Marathi
छायाचित्र श्रीनगरमध्ये पीडीपी नेता महबूबा मुफ्ती यांच्या घराबाहेरचे आहे. निवडणुकीच्या आधी सुरक्षा वाढवली आहे

जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेची (डीडीसी) निवडणूक व इतर स्थानिक पोटनिवडणूक शनिवारपासून सुरू होणार आहे. ही निवडणूक आठ टप्प्यांत हाेणार आहे. त्यात २८० डीडीसी जागांसाठी मतदान होणार आहे. त्याशिवाय सुमारे १३ हजार पंच, सरपंच, यूएलबी सदस्यांसाठीदेखील पोटनिवडणूक होणार आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच व्यापक पातळीवर निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी ४३ डीडीसीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यात जम्मू भागातील १८ व काश्मीरच्या २५ डीडीसीचा समावेश आहे. त्यासाठी २ हजार ६४४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात ७ लाख ३ हजार ६२० मतदार आपला हक्क बजावतील.

प्रचारासाठी नेते मैदानात उतरले होते. परंतु अनेक कारणांमुळे प्रचारात दम दिसून आला नाही. तरुण मुकीत म्हणाला, आधी कलम ३७० मध्ये लॉकडाऊन झाले होते. नंतर कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. आता निवडणूक का होतेय हे काही ठाऊक नाही. यामुळे जनतेला काय फायदा होईल? लोकांच्या मागण्यांची पूर्तता व्हायला पाहिजे. आम्हाला या थंडीच्या काळात चोवीस तास पाणी व वीज हवी आहे. ही गोष्ट तर कोणी देत नाही. विकासाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या मुकीतसारख्या लोकांची येथे कमतरता नाही. प्रत्येक गाव-खेड्यातून नोकरीची मागणी होते. त्यांना रस्ते, वीज-पाणी हवे आहे. एवढे असूनही काही ठिकाणी लोक विकासावर बोलत नाहीत. ते अजूनही जम्मू-काश्मीरच्या जुन्या गोष्टींत रमलेले दिसतात. बडगामचा एक जण म्हणाला, विकासाचे ठीक आहे, परंतु गेल्या वर्षात काहीही घडू लागले आहे. त्यामुळे आम्ही चिंतित आहोत. दर दुसऱ्या दिवशी नवा आदेश येतो. तो आमच्याविरोधात वाटू लागतो. आमच्या नोकऱ्या, जमीन, अधिकार संपले आहेत. आम्हाला स्थैर्य, समाधानाची गरज आहे. काही लोक ही निवडणूक भाजप व नवीन आघाडी पीएजीडी यांच्यातील खरी लढत मानतात. या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आहे. ते गुपकारच्या घोषणेशी संबंधित आहेत. डावे, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स मूव्हमेंटदेखील निवडणुकीच्या मैदानात आहे. पीएजीडीच्या उमेदवारांनी मात्र त्यांना गेस्ट हाऊस, हॉटेलमध्ये बंद करून ठेवल्याचा दावा केला आहे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीने आॅक्टोबर २०१९ मध्ये बीडीसीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्याची पुनरावृत्ती करण्याची दोन्ही पक्षांची इच्छा नाही.

हॉटेलमध्ये शेकडो सरपंच
२०१८ च्या पंचायत निवडणुकीनंतर श्रीनगरच्या हॉटेलमध्ये शेकडो सरपंच मुक्कामी आहेत. त्यांना दहशतवादी हल्ल्याची भीती वाटू लागली आहे. हेच वास्तव आहे. डीडीसी निवडणुकीची देखील अशीच स्थिती होऊ नये. पश्चिम पाकिस्तानातून आलेले स्थलांतरित पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. भाजपने जाहीरनाम्यात खासगी क्षेत्रात रोजगार, उद्योगासाठी अनुकूल धोरण, स्वच्छ-पारदर्शक प्रशासन व स्थानिकांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser