आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Elections Since March 2, There Were 171 New Corona Patients In Bengal ... 7713 New Patients On April 17

प्राणापेक्षा सभा महत्त्वाच्या:निवडणूक 2 मार्चपासून, तेव्हा बंगालमध्ये 171 नवे रुग्ण होते... 17 एप्रिलला 7713 नवे रुग्ण

नवी दिल्ली/कोलकाता9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी बंगाल निवडणुकीत नवा रंग आला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या सभा रद्द केल्या. ते म्हणाले, गर्दीमुळे संसर्ग पसरू शकतो. इतरांनीही विचार करायला हवा. पक्षाने व्हिडिओ काढून मोदी यांच्यावर टीका करत सांगितले की, ते सभेत गर्दीचे कौतुक करतात. दुसरीकडे इतर काँग्रेस नेत्यांच्या सभा सुरू आहेत. गांधींच्या सभांमुळे फरक पडत नाही असे भाजपचे म्हणणे आहे, तर भाजप सभा घेत असेल तर आम्हीही घेऊ, असे तृणमूलने सांगितले.

राहुल गांधींनी सभा रद्द केल्या तेव्हा ममता बरॅकपूर, शहा बर्धमान, काँग्रेसचे अधीर रंजन मालदात सभा घेत होते
जेव्हा राहुल गांधींनी त्यांच्या सभा रद्द करण्याची घोषणा केली तेव्हा बंगालमध्ये भाजप व तृणमूलच्या मोठ्या सभा सुरू होत्या. त्यांच्याच पक्षाचे खा. अधीर रंजन चौधरी मालदात सभा घेत होते. अमित शहा पूर्व बर्धमान, तर ममता बॅनर्जी बरॅकपूरमध्ये सभा घेत होते. ममतांनी सभेत तक्रार केली की, आयोगाने प्रचाराची वेळ कमी केल्याने त्या कमी वेळ बोलत आहेत.

02 सभा राहुल यांनी घेतल्या. त्यांच्या सभांना गर्दी कमी असल्याचे विरोधकांचे म्हणणे. 30 पेक्षा जास्त सभा ममतांनी घेतल्या. सरासरी रोज ८ ते १० सभा, रोड शो करत आहेत. 04 सभा नरेंद्र मोदी २३ एप्रिलला घेतील. हा त्यांचा शेवटचा प्रचार दौरा असेल. शहा आणखी ८ सभा घेतील.

सभा रद्द करण्याच्या राहुल यांच्या निर्णयावर राजकीय रंग
- मी बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करत आहे. ते आवश्यक आहे. इतरांनीही यावर विचार करावा. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
- भाजप राज्यात सभा घेत आहे. जोपर्यंत ते सभा घेतील, आम्हीही सभा घेणार - सौगत राय, तृणमूल खासदार
- राहुल यांच्या सभांमुळे फरक पडत नाही. त्यांच्या सभांना गर्दीही होत नाही. - कैलाश विजयवर्गीय, भाजपचे बंगाल प्रभारी

माजी लष्करप्रमुख म्हणाले : कारगिलपेक्षा जास्त लोक रोज मरताहेत : माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी कोरोना काळात निवडणूक सभा व शेतकरी आंदोलनात जमणाऱ्या गर्दीवर टीका करत म्हटले की, दोन महिने चाललेल्या कारगिल युद्धात जेवढे जवान शहीद झाले होते, त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने एका दिवसात होत आहे. आता जागे व्हा, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...