आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Electrice Highway India | Marathi News | Delhi Jaipur, Delhi Agra Will Be Fully Electric Highways This Year

इलेक्ट्रिक हायवे:दिल्ली-जयपूर, दिल्ली-आग्रा याच वर्षी पूर्णपणे इलेक्ट्रिक हायवे होतील

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इलेक्ट्रिक हायवेच्या दिशेने देशाचे सर्वात मोठे पाऊल, दोन हायवेंनी होणार प्रारंभ ​​​​​​​

गुडगावच्या सेक्टर-५२मध्ये ९६ चार्जिंग पॉईंट असलेले देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन लवकरच सुरू होत आहे. देशभर राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे हे एक मॉडेल आहे. असेच प्रत्येकी एक स्टेशन या वर्षी जयपूर आणि आग्रा येथे उभारले जात आहे. एवढेच नव्हे, तर दिल्ली ते जयपूरपर्यंत २८० किमी महामार्गावर एकूण १० स्टेशन्स उभारले जातील.

दिल्ली-आग्रा मार्गावर ८ स्टेशन्स उभारणीची तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, जयपूर, दिल्ली आणि आग्रा येथे होणाऱ्या स्टेशन्सवर ७५-७५ पॉईंट असतील. म्हणजे, एका वेळी ७५ बॅटरी चार्ज होऊ शकतील. इतर स्टेशन्सवर २० बॅटरी चार्ज करता येतील. दाेन्ही महामार्गांवर एक-एक स्टेशन सौर ऊर्जेवर चालणारे असेल. सर्व फास्ट चार्जिंग स्टेशन्स असून दीड तासांत गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकणार आहे. हे काम याच वर्षी पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

फायदेशीर : स्वत:ची कार असेल तर प्रवासाचा खर्च केवळ दीड रुपया प्रतिकिमी येईल

गुरगावचे चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिफाई नावाची कंपनी चालवत आहे. इलेक्ट्रिफाईचे सीईओ प्रवीण यादव यांनी सांगितले की, गुरगाव स्टेशनवर १२ रु./युनिट चार्जिंग होत आहे. एक साध्या कारची बॅटरी जास्तीत जास्त १८ युनिटमध्ये पूर्णपणे चार्ज होते. ती १९०-२०० किमी चालते. म्हणजे जर तुम्ही बॅटरी घराऐवजी चार्जिंग स्टेशनवर चार्ज केली तर बॅटरी फुलचार्ज करण्याचा खर्च केवळ २१६ रु. येतो. म्हणजे केवळ दीड रुपयात प्रति किलोमीटरचा खर्च होत आहे. या हिशोबाने येत्या काही दिवसांत प्रवास स्वस्त होणार आहे.

प्रवास : कार १० मिनिटे थांबली तर लगेच फोनवर विचारतील, काही अडचण तर नाही?
ई हायवेवर ये-जा करण्यासाठी तीन प्रकारचे वाहन उपलब्ध असतील. पहिले- ई बस, ज्याचे आसन अॅपद्वारे बुक करू शकाल. दुसरे- ब्लू स्मार्ट, ओला, ऊबर, लिथियम अर्बन किंवा ट्रिपल ई टॅक्सीसारख्या कंपन्यांची कार बुक करू शकाल तुम्ही चालकासह किंवा विनाचालक कारही किरायावर घेऊ शकाल. तिसरे- आपल्या ई-कारने प्रवास करू शकाल. जर कार १० मिनिटांसाठी उभी राहिली तर नियंत्रण कक्षातून त्वरित फोनवर विचारले जाईल की, तुम्ही कोणत्या अडचणीत तर नाहीत ना! तथापि, बसेस डेपोतून पूर्णपणे चार्ज झाल्यावरच डेपोतून बाहेर पडतील. परंतु मिडवे चार्जिंग स्टेशनवर अर्ध्या तासाच्या ब्रेकदरम्यान खबरदारी म्हणून चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.

विशेष बाब : बॅटरी संपताच रस्त्यावर केवळ ५ मिनिटांत दुसरी कार मिळेल
अभिजीत सिन्हा यांच्या मते प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर खासगी कॅब फ्लीट तैनात असेल, जशी गुडगावात आहे. जर एखाद्या व्यक्तीने ई-कॅब सर्व्हिसवर चालकासह किंवा स्वत: चालवण्यासाठी कार भाड्याने घेतली असेल तर अनेक फायदे होतील. एखादा बायो ब्रेकसाठी ५ मिनिटे थांबल्यावरच चार्जिंग स्टेशनवर त्याच मॉडेलची पूर्णपणे चार्ज कार मिळेल. चार्जिंग स्टेशन पीपीपी मॉडेलवर उभारले जात आहेत. बजेटमध्ये घोषित केलेल्या बॅटरी स्वॅपिंग पॉलिसीअंतर्गत याच स्टेशन्सवर बॅटरी बदलता येईल. म्हणजे बॅटरी संपल्यावर तुम्हाला चार्जिंगसाठी थांबावे लागणार नाही. तुम्ही बॅटरी जमा करणार आणि थोड्याशा शुल्कात त्याच मॉडेलची चार्ज बॅटरी मिळेल.

पुढील वर्षी मुंबई-सुरत, अहमदाबाद-वडोदरासह ९ हायवेंवर चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजनाही तयार नॅशनल हायवे फॉर इलेक्ट्रिक व्हेइकलचे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत सिन्हा यांनी सांगितले की, दिल्ली-आग्रा, दिल्ली-जयपूर हायवेपर चार्जिंग स्टेशन उभारण्यानंतर पुढील टप्प्याचे काम २०२३ मध्ये होईल. यासाठी ९ हायवे निवडले आहेत. यात मुंबई-पुणे, मुंबई-सूरत, अहमदाबाद-वडोदरा, बंगळुरूू-म्हैसुरू, बंगळुरू-चेन्नई, ईस्टर्न पेरीफेरल, आगरा-लखनौ एक्स्प्रेसवे, आग्रा-दिल्ली हायवे आणि हैदराबाद आउटर रिंग रोड एक्स्प्रेस-वेचा समावेश आहे. यानंतर पुढील टप्प्यात ९ महानगरे मुंबई, दिल्ली,बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, सूरत आणि पुणेला जोडणारे ५-५ हायवे इलेक्ट्रिक हायवेमध्ये बदलले जातील.

बातम्या आणखी आहेत...