आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Electricity Company Stopped The Supply Of Village, MLA Himself Climbed The Pole, Connected The Electricity, Latest News And Update 

काँग्रेसचे आमदार बनले लाइनमन:कंपनीने गावातील वीज तोडली, आमदारांनी स्वतःच पोलवर चढून जोडले कनेक्शन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका गावातील वीज प्रवाह खंडीत झाल्याने संतप्त झालेल्या कॉंग्रेसच्या आमदाराने स्वतःच खांबावर चढून वीज कनेक्शन जोडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील काठोडी गावातील आहे.

वीज कंपनीने गावाचा पुरवठा खंडित केला होता. ही बाब आमदारांना समजताच त्यांनी कोणतीही सेफ्टी किट न घालता खांबावर चढून लाईन जोडली. या वेळी सुदैवाने मेन कनेक्शन चालू नव्हते. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सोमवारपासून मध्यप्रदेश राज्यात सुरूवात झाली आहे. राहुल गांधींच्या मुख्य प्रवासात ही यात्रा पाहायला मिळत आहे. यादरम्यान काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल भारत जोडो यात्रा घेऊन काठोडी गावात पोहोचले होते. रात्री इथे वीज नव्हती. वीजबिल न भरल्याने कंपनीने गावाचा वीजपुरवठा खंडित केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बिल न वीज प्रवाह खंडीत करण्यात आला होता

आमदार बाबू जंडेल काठोडी गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अंधार होता. तेव्हा जंडेल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. वीज का बंद झाली आहे, अशी विचारणा केल्यानंतर बिल न भरल्याने वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सद्याच्या परिस्थितीत आम्ही ते सादर करू शकत नाही. आमच्याकडे जे पैसे होते ते शेती आणि घरकामासाठी वापरले आहेत. आम्ही बिल भरण्यासाठी वेळ मागितला होता. अधिकाऱ्यांनी तातडीने बिल जमा करण्यास सांगितले. आम्ही तसे करू शकलो नाही त्यामुळे आमच्या गावाचा वीजप्रवाह खंडीत करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या काँग्रेस आमदारांनी व ग्रामस्थांसमवेत कोणतीही सुरक्षा न घेता वीजेच्या खांबावर चढले. यावेळी जर अचानक मुख्य लाईनमध्ये विद्युत प्रवाह सुरू झाला असता तर अनर्थ झाला असता. अर्थात जीवघेणा ठरला असता.

सेफ्टी किट न घालता खांबावर चढणे जीवघेणे
ग्रामस्थांच्या समस्या ऐकून आमदारांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. मात्र, काम न झाल्याने मंगळवारी ते स्वतः खांबावर चढले. त्यांच्यासोबत ग्रामस्थही होते. दोघांनी मिळून गावाचा वीजपुरवठा सुरू केला. आमदारांनी सुरक्षा किटही घातली नव्हती. हे अत्यंत जोखमीचे काम असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी वीज कंपनीचे पथक नव्हते. अशा परिस्थितीत लाइनमध्ये विद्युत प्रवाह चालला असता तर जीवघेणे ठरू शकते.

आमदार म्हणाले - इंग्रज सुद्धा 20 दिवसांचा वेळ देत
गावाचा वीजपुरवठा जोडल्यानंतर काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल म्हणाले- शेतकऱ्यांनी बिल जमा करण्यासाठी 20 दिवसांची मुदत मागितली होती. इंग्रज आणि इतर लोकही याला जास्त वेळ देत असत. याबाबत मी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलले असता थकबाकीचे बिल तातडीने जमा करावे, असे शासनाने स्पष्ट निर्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांना साधे विस दिवस देखील मुदत देऊ शकत नसेल तर मोठी लाजीवरवाणी गोष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...