आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Electricity Department Employee Collects Electricity Bill From Horse, Latest News And Update

घोड्यावर बसून वीज बिल वसुली:कर्मचारी म्हणाला -पेट्रोलचे दर वाढलेत, दुचाकी चालवणे परवडेना, विद्युत विभागाने केला वैयक्तिक निर्णय असल्याचा दावा

पाटणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे हैराण झालेला बिहारमधील एक विद्युत कर्मचारी चक्क घोड्यावर बसून थकीत वीज बिल वसुली करत आहे. त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 'पेट्रोलचे दर गगनाला भीडल्यामुळे आता दुचाकी चालवणे परवडत नाही. त्यामुळे मी घोड्यावर बसून वीज बिल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी दुचाकीवर दररोज 250 रुपयांहून अधिकचा खर्च येतो. त्या तुलनेत घोड्यावर केवळ 60-70 रुपयांत काम भागते,' असे या कर्मचाऱ्याने सांगितले.

घोड्यावर अवघा 60-70 रुपयांचा खर्च

व्हिडिओत दिसणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अभिजित तिवारी आहे. विष्णुपूरच्या किशुनदेव गावात राहणारा हा कर्मचारी वीज महामंडळात काम करतो. त्यांच्या वडिलांनी छंद म्हणून घोडा पाळला होता. त्याने या घोड्यावर दिवसाकाठी अवघा 60-70 रुपयांचा खर्च येत असल्याचे सांगितले.

'पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे खिशावरील भार वाढला आहे. वीज वसुलीसाठी फिरताना दररोज 250 रुपयांचे पेट्रोल लागते. त्यामुळे मी दुचाकी ऐवजी घोड्यावरुन वीज बिल वसुलीचा पर्याय निवडला,' असे तिवारी म्हणाले.

वीज विभागाने राखले अंतर

ऊर्जा विभागाचे अधिकारी श्रवण कुमार ठाकूर यांनी तिवारी यांचा घोडा वापरण्याचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले आहे. 'वसुली दुचाकीवरुन करावी की घोड्यावरुन हा कर्मचाऱ्याचा वैयक्तिक निर्णय आहे. सद्यस्थितीत दुचाकीच्या तुलनेत घोडा पाळणे स्वस्त आहे,' असे ते म्हणाले.

ऊर्जा विभागाचे अधिकारी श्रवण कुमार ठाकूर
ऊर्जा विभागाचे अधिकारी श्रवण कुमार ठाकूर
बातम्या आणखी आहेत...