आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाविषयी चांगली बातमी:जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीला भारतात आपत्कालीन मंजुरी, कोरोना व्हायरसविरुद्ध 85% प्रभावी; लवकरच होणार उपलब्ध

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक चांगली बातमी समोर आली आहे. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लसीच्या आपत्कालीन वापराला सरकारने मान्यता दिली आहे. आता ही लस लवकरच भारतीय बाजारात मिळण्याची आशा वाढली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली.

मागील आठवड्यात, जॉनसन अँड जॉन्सन या अमेरिकन कंपनीने भारतात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी परवानगी मागितली होती. तथापि, भारतात लसीच्या आपत्कालीन वापरासाठी क्लिनिकल चाचण्या आवश्यक नाहीत.

सूत्रांनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने DGCI ला दिलेल्या अर्जात म्हटले होते की, त्यांना भारतातील 600 लोकांवर चाचण्या घ्यायच्या आहेत. चाचणी दोन गटांमध्ये करण्यात येणार असल्याची मागणी केली होती. एका गटात 18 ते 60 वयोगटातील लोकांना ठेवले जाईल.

दुसऱ्या गटामध्ये 60 वर्षांवरील लोक असतील. तिसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती पातळी तपासली जाईल. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या लसीचा फक्त एकच डोस देण्यात येणार आहे. लसीकरणानंतर 28 दिवसांनी रक्ताचे नमुने घेऊन प्रतिकारशक्तीची पातळी तपासली जाईल.

बातम्या आणखी आहेत...