आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीहून दोह्याला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या एका विमानाला तांत्रिक बिघाडामुळे कराचीकडे वळवण्यात आले आहे. या विमानात 100 प्रवाशी होते. चीनमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यातील प्रवाशांत घबराट पसरली होती. कतार एअरवेजने कार्गोत धूर पसरल्यामुळे या विमानाची कराचीत आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेच्या चौकशीचेही आदेश देण्यात आलेत.
कतार एअरवेजचे हे विमान क्यूआर-579 सोमवारी सकाळी दिल्लीहून रवाणा झाले होते. त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे ते कराचीकडे वळवण्यात आले. तिथे त्याची सुरक्षित लँडिंग करण्यात आली. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागला.
प्रवाशांना 3 तासांपर्यंत कोणतीही माहिती देण्यात आली नाही
प्रवाशी विक्रम पसरिचा आपल्या पत्नी व एका वर्षाच्या मुलीसह दोह्याला जात होते. त्यांनी सांगितले की, विमान सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कराचीत लँड झाले. त्यानंतर कोणतीही माहिती न देता प्रवाशांना विमानाबाहेर पडण्याची सूचना करण्यात आली. आम्हाला जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रांझिट लाऊंजमध्ये बसवण्यात आले.
विक्रमने सांगितले, 3 तासांपर्यंत आम्हाला पाणी व जेवणच नाही तर कोणती माहितीही देण्यात आली नाही. एवढेच नाही तर वायफायची सुविधाही देण्यात आली नाही. यामुळे आम्हाला आमच्या नातेवाईकांशी संपर्क साधता आला नाही. केवळ पाकच्या दूरध्वनी क्रमांकांना वायफायचे अॅक्सेस होते.
विमानात होते वृद्ध व मुले
अन्य एक प्रवाशी डॉक्टर समीर गुप्ता यांनी सांगितले की, विमानात ज्येष्ठ नागरिक व मुले होती. त्यानंतरही कराची विमानतळावर कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. आपत्कालीन लँडिंग का करण्यात आली, याची माहितीही आम्हाला देण्यात आली नाही.
प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले
नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या तक्रारींची दखल घेतल्यानंतर काही प्रवाशांना जेवण देण्यात आले. सोबतच त्यांच्यासाठी दुसऱ्या विमानाची सोयही करण्यात आली. दुसरीकडे, कतार एअरवेजने एका विमानाद्वारे या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रवाशांना झालेल्या असुविधेबद्दल कंपनीने माफीही मागितली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.