आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Emergency Package Of 15 Thousand Crore Approved For States; Expenditure On Medicines, Laboratories And Medical Devices

निर्णय:राज्यांसाठी 15 हजार काेटींचे आपत्कालीन पॅकेज मंजूर; औषधे, प्रयोगशाळा आणि मेडिकल उपकरणांवर होईल खर्च

नवी दिल्ली 3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ७ हजार ७७४ कोटी रुपये कोविड-१९ आपत्कालीन प्रतिसादावर खर्च होतील

केंद्र सरकारने राज्यांसाठी १५ हजार काेटी रुपयांचे ‘काेविड- १९ आपत्कालीन प्रतिसाद व आरोग्य यंत्रणा तयारी पॅकेज’ मंजूर केले अाहे. याचा वापर अावश्यक वैद्यकीय उपकरणे अाणि अाैषध खरेदी करण्यासाठी केला जाईल. यातील ७ हजार ७७४ कोटी रुपये कोविड-१९ आपत्कालीन प्रतिसादावर खर्च होतील. उर्वरित रक्कम वेगवेगळ्या टप्प्यात खर्च केली जाईल. आरोग्य मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्राच्या १०० टक्के आर्थिक मदतीचे पॅकेज जानेवारी २०२० ते मार्च २०२४ दरम्यान तीन टप्प्यात लागू होईल. पॅकेजमधून दिलेल्या जाणाऱ्या रकमेचा वापर पीपीई, एन- ९५ मास्क आणि व्हेंटिलेटर इत्यादींच्या खरेदीसाठी केला जाईल.

पीपीईची टंचाई नाही

आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड- १९ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) बाबत चिंतेचे कारण नाही. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, २० कंपन्या पीपीईचे उत्पादन करतात. याचा तुटवडा होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...