आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Emergency Was Wrong, But The Institutional Framework Was Not Captured As It Is Now: Rahul Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:आणीबाणी चूकच, मात्र संस्थात्मक चौकटीवर आतासारखा कब्जा केलेला नव्हता : राहुल गांधी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीय संस्थांमध्ये रा.स्व. संघाच्या समर्थकांचीच भरती होत असल्याचा आरोप

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशात लावलेली आणीबाणी चुकीचीच असल्याचे म्हटले आहे. काॅर्नेल विद्यापीठाच्या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करत मंगळवारी ते म्हणाले, “आणीबाणी निश्चितपणे चुकीचीच होती. मात्र त्या काळी जे घडले आणि आज जे देशात होत आहे, या दोन्हींत मूलभूत फरक आहे.’ राहुल यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात १९७५ ते १९७७ अशा २१ महिन्यांपर्यंत आणीबाणी लागू केली होती.

राहुल म्हणाले, “काँग्रेस भारताचा घटनात्मक ढाचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्या पक्षाची रचना आम्हाला त्याची परवानगी देत नाही. इच्छा असूनही आम्ही तसे करू शकत नाही.’ त्यांनी आरोप केला की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानाची मौलिक चौकट मोडून काम करत आहे. संघ देशातील संस्थांमध्ये आपल्या लोकांची भरती करत आहे. आम्ही जर निवडणुकांत भाजपला पराभूत केले तरीही त्यांच्या लोकांपासून सुटका करून घेण्यासाठी संस्थात्मक रचनेत आपल्या लोकांची भरती करू देणार नाही.’

पक्षात निवडणुकीचा मुद्दा काढला तर स्वकीयांनीच घेरले
राहुल यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीच्या प्रश्नालाही उत्तर दिले. ते म्हणाले, “मी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या निवडणुकांवर भर दिला होता. मात्र माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्यावर टीका केली. मात्र कुणी भाजप, बसप व सपातील अंतर्गत लोकशाहीवर प्रश्न विचारत नाही.’

बातम्या आणखी आहेत...