आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेकरी डाॅट काॅमच्या अहवालानुसार:देशातील उदयोन्मुख, दुसऱ्या दर्जाच्या शहरांत नव्या नाेकऱ्यांची संख्या जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उदयोन्मुख नवीन आणि दुसऱ्या दर्जाच्या शहरांमधून नोकऱ्यांबाबत चांगली बातमी आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये या शहरांमध्ये अधिक नोकऱ्या मिळाल्या आहेत. यामुळे नोकरीच्या निर्देशांकात सुधारणा झाली आहे. नाेकरी डाॅट काॅमच्या जॉब्सस्पीक इंडेक्सनुसार, कोईमतूरने ऑगस्ट महिन्यासाठी नोकरीच्या यादीत २८% वाढीसह वर्ष-दर-वर्ष आधारावर अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर कोची (२७%), अहमदाबाद (२०%) आणि जयपूर (१५%) यांचा क्रमांक लागतो. चंदीगड (-१७%) आणि वडोदरा (-११%) वगळता, इतर उदयोन्मुख शहरांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली. मुंबई १% वाढीसह अव्वल स्थानावर आहे, तर दिल्ली/एनसीआर, हैदराबाद आणि पुणे या शहरांनी कोणतीही वाढ दर्शविली नाही.

प्रवास, हाॅटेलिंग अव्वल सेक्टर वाढ प्रवास, हाॅटेलिंग 56% बँकिंग-वित्तीय सेवा 3% ऑटो-ऑटो संलग्न 29% रिअल इस्टेट 24% किरकोळ 18% -नाेट : मागील वर्षीच्या तुलनेत.

विमा क्षेत्रात सर्वाधिक वाढ विमा, बीएफएसआय, वाहन, प्रवास आणि हाॅटेल (आदरातिथ्य), रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्रात जास्त नोकऱ्या मिळाल्या. आयटीमध्ये भरतीची प्रक्रिया संथ आहे. मागील वर्षाच्या तुलनेत विमा क्षेत्रात ८७% नाेकऱ्या वाढल्या. यात ४-७ वर्षांच्या अनुभवासाठी (१०३%) सर्वाधिक भरती होती. त्यानंतर ०-३ वर्षे (९९%) आणि ८-१२ वर्षे (४२%) अशी स्थिती राहिली. या क्षेत्रात एनसीआर (१३६%) व मुंबई (१२९%) मध्ये नाेकरभरतीत लक्षणीय वाढ दिसली.

बातम्या आणखी आहेत...