आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Emotional CM Channi Said Congress Rule In Punjab From Today, I Will Cut My Throat For Farmers, Rahul, Revolutionary Leader, Praised Amarinder But Sidhu's Dominance Was Shown; News And Live Updates

पहिली पत्रकार परिषद:भावूक झाले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत, म्हणाले- शेतकऱ्यांसाठी जीव सुद्धा देईन; कॅप्टन-सिद्धू यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न

जालंधर4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या गोष्टी

पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत भावूक झाले. मुख्यमंत्री चन्नी यांनी पंजाब भवनात कृषी सुधारणा कायद्याबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, पंजाब हे कृषी आधारित राज्य आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. जर शेतकऱ्यांवर काही संकंट आले तर मी माझा गळा कापून देईन.

पत्रकार परिषदेदरम्यान, चन्नी यांनी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचेदेखील खुलेपणाने कौतूक केले. चन्नी यांनी कॅप्टनला पंजाबच्या पाण्याचा रखवालदार संबोधले आहे. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री केल्याबद्दल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले असून त्यांचा क्रांतिकारी नेते म्हणून वर्णन केले आहे.

पत्रकार परिषदेत सिद्धूचे वर्चस्व कायम
मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांचे वर्चस्व दिसून आले. यावेळी ते मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्या शेजारी बसले होते. मुख्यमंत्री जेंव्हाही भावनिक झाली तेंव्हा सिद्धू त्यांच्या पाठीवर थाप देताना आणि हात धरताना दिसले. मुख्यमंत्री चन्नी यांनीही सिद्धू यांच्या शैलीत परिषद संपवली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोणत्याही प्रश्नांचे उत्तर दिले नाही.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या गोष्टी

 • वाळू व्यावसायिक आणि माफियांनी मला भेटू नये. मी त्यांचा प्रतिनिधी नाही.
 • शेतकऱ्यांना वीज माफ केली जाईल. यासोबतच गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर्सची बिलेदेखील घेतली जाणार नाहीत.
 • थकीत बिल असणाऱ्यांचे वीज बिल माफ केले जाईल. खंडित कनेक्शन जोडले जातील. बिल न भरल्यास कोणाचेही कनेक्शन तोडले जाणार नाही.
 • कॅप्टन अमरिंदर यांनी चांगले काम केले, परंतु अपूर्ण राहिलेले काम आम्ही पूर्ण करणार आहोत.
 • अपवित्रता आणि इतर मुद्द्यांसह काँग्रेस हायकमांडचा 18 कलमी फॉर्म्युला लागू केले जाईल.
 • कोणाशीही लढणार नाही, पण कोणालाही सोडणार नाही.
 • पोलीस स्टेशनचा एसएचओ कोणालाही त्रास देणार नाही.
 • एक तर तहसीलमध्ये भ्रष्टाचारी राहतील किंवा मी मुख्यमंत्री?
 • सर्व कर्मचाऱ्यांनी संप संपवून कामावर परतावे. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील.
बातम्या आणखी आहेत...