आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप गुजरात निवडणुकीच्या रणनीतीवर काम करत विविध राज्यांतील नेत्यांना निवडणूक मोहिमेत उतरवत आहे. या नेत्यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. १० मे रोजी राज्यात निवडणूक आहे. भाजप सूत्रांनुसार, पक्षाने २२४ जागांपैकी ११५ जागांवर भर देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, खासदार तसेच आमदारांसह ५० ते ६० नेत्यांना दोन ते तीन जागांची जबाबदारी दिली आहे. त्यांना अवघड ठरणाऱ्या जागा ताब्यात मिळाव्यात यासाठी मार्ग सुखकर करण्यास सांगितले आहे.
काँग्रेसच्या दुसऱ्या यादीवर निर्णय उद्या : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी सांगितले की, काँग्रेस उमेदवाराच्या दुसऱ्या यादीबाबत ४ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. त्यांच्या कोलार मतदारसंघातून निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहे. काँग्रेसने १२४ नावांची घोषणा केली आहे. अद्याप १०० नावे बाकी आहेत. यामध्ये ५२ जागांवर एकच नाव पाठवले आहे. पहिल्या यादीत सिद्दरामय्या यांचे नाव वरुणा मतदारसंघात निश्चित झाले आहे. ते कोलारमधून इच्छुक आहेत. वरुणामध्ये त्यांच्या विरोधात येदियुरप्पा यांचे पुत्र बीवाय चिजयेंद्र यांना भाजप उतरवू शकते. दुसरीकडे, अरसिकेरे जागेवरून जेडीएस खासदार केएम शिवलिंगे गौडा यांनी राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.