आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Employees: Government Will Not Decreases A 'Take Home Salary'; Employees News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:पगारदारांना सरकारचा दिलासा; ‘टेक होम सॅलरी’ घटणार नाही; हा झाला असता बदल

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी वेतन संहिता लागू झाल्यानंतर पगारदारांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल झाला असता

एक एप्रिलपासून लागू होणारी नवी वेतन संहिता लांबणीवर पडली आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांच्या पगार अाराखड्यात बदल होणार नाही. यामुळे आता टेक होम सॅलरी कमी होणार नाही. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, नव्या कामगार कायद्यांबाबत राज्यांनी नियमांना अंतिम रूप दिलेले नाही. यामुळे केंद्राने वेतन संहितेचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. यामुळे कंपन्यांना आराखड्यात बदलासाठी आणखी वेळ मिळेल.

हा झाला असता बदल
नवी वेतन संहिता लागू झाल्यानंतर पगारदारांच्या सॅलरी स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल झाला असता. यामुळे हाती पडणारा पगार कमी झाला असता. तसेच पगारातील मोठा हिस्सा पीएफ खात्यात जमा झाला असता. या नियमानुसार, वेतनात बेसिक सॅलरीचा पार्ट ५० टक्के असणे आवश्यक आहे. पीएफपोटी जास्त रक्कम द्यावी लागू नये म्हणून कंपन्या तो पार्ट कमीच ठेवत असतात.

बातम्या आणखी आहेत...