आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Employee's Womens Appeal To Modi: Is It Written On The Broom, Or Should It Be Women? Why Don't Men Contribute?

दिव्य मराठी विशेष:नोकरदार महिलेचे मोदींना आवाहन- झाडूवर लिहिलेले असते का, की महिलांनीच झाडावे? पुरुष हातभार का लावत नाहीत?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात घर-ऑफिसच्या कामाने वैतागलेल्या महिलेची ऑनलाइन याचिका
  • लोकांची मानसिकता बदलणे हाच ऑनलाइन याचिकेचा हेतू

केवळ महिलांनीच झाडू मारावा, असे झाडूच्या हँडलवर किंवा वॉशिंग मशीन तसेच गॅस स्टोव्हच्या मॅन्युअलमध्ये लिहिलेले असते का? मग तरीही बहुतांश पुरुष घरकामामध्ये हातभार का लावत नाहीत? जवळजवळ प्रत्येक घराशी निगडित असलेले हे प्रश्न कोरोना काळात महिलांच्या घर आणि स्वयंपाकघरातील अचानक वाढलेल्या कामकाजाविषयी दाखल केलेल्या ऑनलाइन याचिकेचा भाग आहेत. मुंबईतील सुवर्णा घोष यांनी ही आगळीवेगळी याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे या याचिकेवर सुमारे ७१ हजारांपेक्षा जास्त जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या एखाद्या विशेष भाषणात किंवा जनसंवादात या विषयावर बोलावे व तोडगा काढून पुरुषांनाही घरकामातील त्यांच्या जबाबदाऱ्या लक्षात आणून द्याव्यात, अशी घोष यांची इच्छा आहे. लॉकडाऊनदरम्यान सुवर्णा यांच्यावर घर व ऑफिसच्या कामाचा ताण होता. ही याचिका त्यातील अनुभवाची कथा आहे. खरे तर ही प्रत्येक घराशी निगडित बाब आहे. अनेक महिला याचा सामना करत आहेत. घरगुती कामाची जबाबदारी केवळ त्यांच्यावरच असते. स्वयंपाक, स्वच्छता, कपडे धुणे इत्यादी कामे महिलाच करतात. सुवर्णा एक समाजसेवी संस्थाही चालवतात. त्यांचे पती बँक कर्मचारी आहेत. त्या सांगतात, ऑफिसच्या कामासोबत तडजोड करण्याची अपेक्षाही महिलांकडूनच बाळगली जाते. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या ऑफिसच्या कामावर याचा परिणाम झाला. वर्क फ्रॉम होम आणि घरातील कामे यामुळे त्या खूप थकायच्या. कुटुंबातील संतुलन बिघडले होते. त्यांनी याबाबत तक्रारही केली. मात्र, या स्थितीत नंतर बदल झाला. घोष म्हणतात, हा मूलभूत विचार आहे. लोकांची मानसिकता बदलणे हाच याचिकेचा मूळ हेतू आहे.

मोदींना उद्देशून हिंदी कवितेतून व्यक्त केली अशी ‘मन की बात’

लॉकडाउन के बहाने से यह बात याद आई, घरबंदी मर्दों को क्या किसी ने नहीं समझाई?

घर का काम औरत का है, बोलके उसने ठुकराया, जीडीपी की बात छोड़ो, अपनों ने भी भुलाया.

तब सोचा क्यों न मोदीजी से बात चलाएं

कि, अगले स्पीच में मर्दों को ये याद दिलाएं

​​​​​​​घर का काम हर दिन है सबका

​​​​​​​लॉकडाउन में फिर काम क्यों बढ़ता?

भागीदारी ही है जिम्मेदारी

​​​​​​​क्या बराबरी नहीं इंडिया को प्यारी?