आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Employment By Supplying 20 Lakh Liters Of Milk And 25 Lakh Eggs Every Month, Soldiers Spending 15% Of Their Salary In Ladakh

दुसरा पैलू:लडाखमध्ये सेना वाढताच अर्थव्यवस्थेत उसळी; दरमहा 20 लाख लिटर दूध, 25 लाख अंड्यांच्या पुरवठ्याने रोजगार

नवी दिल्ली / मुकेश कौशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या आडमुठेपणामुळे लडाखमध्ये १७ महिन्यांपासून तणाव आहे. चर्चेच्या फेऱ्या अनिर्णायक ठरल्या. त्यामुळे आता आपल्या सैनिकांना या वेळीही कडाक्याच्या थंडीत पूर्व लडाखमध्ये आपली स्थिती मजबूतपणे राखावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. परंतु या तणावाचा दुसरा पैलूही आहे. सेनेच्या दीर्घ तैनातीमुळे लडाखच्या अर्थव्यवस्थेने उसळी घेतली आहे. सैनिकांच्या तैनातीशी निगडित हालचाली, बांधकामे आणि संसाधनांच्या पुरवठा साखळीत सातत्याने स्थानिक लोक जोडले गेल्याने या नवीन संघराज्यात रोजगाराचे नवे आयाम जुळले गेले. एवढेच नव्हे तर येथील विकासकामांतही तेजी आली आहे. स्थानिक प्रशासनाशी संबंधित लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सैनिकांच्या तैनातीचा सुरुवातीचा काळ तणावपूर्ण होता. जनता नेहमीच भीतीच्या सावटात होती. जसजसी सैनिकांची संख्या वाढत गेली तसतसे सुरक्षेचे वातावरण निर्माण होत गेले. सैनिकांची तैनाती आता सामान्य जीवनाचाच एक भाग बनली आहे.

अतिरिक्त सैनिकांच्या नियुक्तीचा थेट परिणाम येथून होणाऱ्या संसाधनांच्या सोर्सिंगवर झाला. भाज्या लडाखमध्ये पिकवल्या जात नसल्या तरी उर्वरित गरजेच्या वस्तू जसे अंडी, मांस, दूध पुरवठा स्थानिक स्तरावर होत आहे. दर महिन्याला सुमारे २५ लाख अंडी, २० लाख लिटर दूध, ३ हजार किलोहून अधिक मांसाचा पुरवठा थेट स्थानिक लोकांच्या मदतीने होत आहे. लडाखच्या कोअर सेक्टरमध्ये शेळी-मेंढी, याकपालन वाढले. एक लाखावर शेळ्या-मेंढ्या आणि १० हजार याकचे पालन या परिसरात केले जात आहे. आता लोकांनी हा व्यवसाय दुप्पट केला आहे. एका अधिकाऱ्याच्या मते प्रत्येक सैनिक तैनातीच्या क्षेत्रात वेतनाचा १५-२०% भाग स्थानिक अर्थव्यवस्थेला देतो. १७ महिन्यांच्या तैनातीत जवान ते जेओसींनी सुमारे ३ हजार कोटी खर्च केले आहेत. लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे नगरसेवक कोनचोक स्टेनजिन म्हणाले की, सेनेच्या वाढत्या तैनातीमुळे येथे विकास होत आहे. आम्ही सैनिकांच्या मागण्याही पूर्ण करू शकत नाही.

रस्ते कामास १५ वर्षे लागली असती, लष्कराने १५ महिन्यांतच पूर्ण केले : पूर्व लडाख भाग प्रचंड उंचीवर व हवामानाच्या अडचणींमुळे मूलभूत विकासापासून वंचित होता. उत्तर कमांडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, लष्कर या भागात आल्यानंतर रस्ते, पूल आणि बोगदे सतत बांधले गेले. दुर्गम गावांतही रस्ते झाले आहेत. ही कामे व्हायला कदाचित १५ वर्षे लागली असती. परंतु, स्थानिक मजुरांच्या मदतीने हे काम १५ महिन्यांतच पूर्ण होऊ शकले.

बातम्या आणखी आहेत...