आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियातील सर्वात मोठा बोगदा:गडकरींनी जोझिला बोगद्याची केली पाहणी, रोजगारात तिप्पट वाढीचा व्यक्त केला विश्वास

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी साेमवारी जाेझिला बाेगद्याची पाहणी केली. १३.१४ किमी लांबीचा हा आशियातील सर्वात माेठा बाेगदा आहे. हा भाग गांदरबल जिल्ह्यातील बालटालमध्ये येताे.

या प्रकल्पावर ४९०० काेटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गडकरी म्हणाले, भारत आणि जगभरातील लाेक स्वित्झर्लंडला जातात. खरे तर आपले काश्मीर स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर आहे. आगामी ३-४ चार वर्षांत जम्मू-काश्मीरमधील रस्ते वाहतूक व पायाभूत व्यवस्थेला अमेरिकेच्या बराेबरीला आणू. हा बाेगदा तयार झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या पर्यटनात २-३ पटीने वाढ हाेईल.