आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-कश्मीरमध्ये एनकाउंटर:शोपीयाच्या सुगू भागात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान, 4 दिवसात 14 दहशतवादी ठार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 दिवसात 7 एनकाऊंटर, 21 दहशतवादी मारले गेले

जम्मू-कश्मीर / शोपीया जिल्ह्यातील सुगू भागात सुरक्षा दलाने 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी लपून बसले असल्याची सूचना मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यापूर्वी सोमवारी शोपीयाच्या पिंजोर भागात सुरक्षा दलाने 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. रविवारी शोपीयाच्या रेबन गावात 5 दहशतवादी मारले गेले होते.

10 दिवसात 7 एनकाऊंटर, 23 दहशतवादी मारले गेले

गुप्तचर विभागाने मागील महिन्यात पाकिस्तानातून दहशतवादी घुसखोरीचा अलर्ट दिला होता. त्यानंतर सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

1 जून : नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करताना 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले.

2 जून : पुलवामाच्या त्राल भागात 2 दहशतवादी मारले गेले.

3 जून: पुलवामाच्याच कंगन भागात सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना मारले.

5 जून: राजौरी जिल्ह्यातील कालाकोटमध्ये एक दहशतवादी मारला गेला.

7 जून: शोपियाच्या रेबन गावात 5  दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातले.

8 जून: शोपियाच्या पिंजोर गावात 4 दहशतवादी ठार. 

10 जून: शोपियाच्या सुगू भागात 5 दहशतवाद्यांचा खात्मा.

बातम्या आणखी आहेत...