आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये बुधवारी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. त्याची ओळख पटलेली नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान चकमक होण्याचा सलग तिसरा दिवस आहे.
दोन दिवसात दोन लष्कर कमांडर मारले गेले, त्यात वसीम बारीचा मारेकरीही होता सोमवारी आणि मंगळवारी बारामुल्लाच्या करीरी भागात चकमकी झाल्या. यावेळी सुरक्षा दलाने 3 अतिरेकी ठार केले. यात दोन लष्कर कमांडर सज्जाद उर्फ हैदर आणि उस्मान यांचा समावेश आहे. हैदर बांदीपोरा हा खुनांचा मुख्य सूत्रधार आहे. तो दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करायचा. पोलिस, नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांमध्येही त्याचा सहभाग आहे. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, परदेशी दहशतवादी उस्मानने भाजपा नेते वसीम बारी, त्याचे वडील आणि भाऊ यांना ठार मारले होते.
#UPDATE: 1 unidentified terrorist killed in an encounter between security forces and terrorists in Shopian district of South Kashmir. Operation is still going on: J&K Police https://t.co/J1J1MvHJSz
— ANI (@ANI) August 19, 2020
तीन दिवसांत 5 सैनिकही शहीद झाले
बारामुल्ला येथे सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका पार्टीवर हल्ला केला. या हल्ल्यात 3 सैनिक ठार झाले. मंगळवारी या चकमकीत जखमी झालेल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी, 1 जुलै रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरात सीआरपीएफच्या पार्टीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सैनिक ठार झाला आणि 3 जखमी झाले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.