आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Encounter For The Second Consecutive Day In Jammu And Kashmir Three Militants Were Killed By Security Forces In Shopian; Two Terrorists Are Hiding In The Mosque And Firing, They Were Sent To The Imam To Explain.

24 तासात दुसऱ्यांदा शोपियांमध्ये चकमक:सुरक्षादलाकडून 5 दहशतवाद्यांचा खात्मा; मशीदीत लपलेल्या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे यासाठी इमामांनी केले प्रयत्न

शोपियां2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मशीद वाचवण्यासाठी सुरक्षा दलाने थांबवले होते ऑपरेशन

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी चकमक सुरू होती. येथील एका मशीदीत लपलेल्या 5 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला असून, परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. सुरक्षा दलाने आधी दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगितले होते. त्यांची समजूत काढण्यासाठी स्थानिक इमाम आणि एका दहशतवाद्याच्या भावाला मशिदीत पाठवण्यात आले होते, पण दहशतवादी त्यांचं ऐकायला तयार नव्हते. अनेक तास चाललेल्या चकमकीनंतर दहशतवाद्यांना मारण्यात यश आले.

मशीद वाचवण्यासाठी सुरक्षा दलाने थांबवले ऑपरेशन

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून सतत गोळीबार सुरू होता. यात मशीदीला नुकसान पोहचू नये, म्हणून आम्ही काही वेळ ऑपरेशन थांबवले होते. पण, अखेरपर्यंत दहशतवादी ऐकायला तयार नसल्याचे दिसले आणि मग आम्ही आमच्या बाजूने गोळीबार सुरू केला. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी शोपियांच्या जनमोहल्ला परिसरात झालेल्या एनकाउंटरमध्ये सुरक्षा दलाने 3 दहशतवाद्यांना मारले होते.

बातम्या आणखी आहेत...