आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश:श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉप कमांडर डॉ. सैफुल्ला ठार

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

CRPF आणि पोलिसांनी श्रीनगरमध्ये मोठे यश मिळाले आहे. रविवारी दुपारी झालेल्या चकमकीत हिजबुलचा टॉप कमांडर सैफुल्ला ठार झाला आहे. यादरम्यान पोलिसांनी त्यांच्या साथीदाराला अटक केले. घटनास्थळावरुन एक एके-47 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आले.

चकमकीनंतर काश्मीर पोलिसांनी सांगितले की, आम्ही 95% खात्रीने सांगू शकतो की, चकमकीत मारला गेलेला दहशतवादी हिजबुलचा चीफ कमांडर होता. आम्हाला काल रात्री दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्च ऑपरेशन सुरू केले होते. हिजबुलचा टॉप कमांडर ठार होणे, हे आमच्यासाठी मोठे यश आहे.

डॉक्टर असलेला सैफुल्ला जखमी दहशतवाद्यांवर उपचार करायचा

सैफुल्लाने घाटीत रियाज नायकूच्या मृत्यूनंतर हिजबुलचे नेतृत्व हाती घेतले होते. डॉक्टर सैफुल्ला उर्फ अबु मुसैद पुलवामाच्या मलंगपोराचा रहिवासी होता. तो बुरहान वानीच्या 12 दहशतवाद्यांच्या टीममध्ये सामील होता. सैफुल्ला A++ कॅटेगरीतील दहशतवादी होता. डॉक्टर असल्यामुळे तो चकमकीत जखमी झालेल्या दहशतवाद्यांचा उपचार करायचा. सध्या काश्मीरमधील सक्रीय 10 मोस्ट वांटेड दहशतवाद्यांमध्ये त्याचे नाव टॉपवर होते.