आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Encounter Underway In Jammu Kashmir Lakirpur Area Of Kulgam Between Terrorists And Security Forces

जम्मू-कश्मीरमध्ये एन्काउंटर:शोपियांमध्ये सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत एक दहशतवादी ठार, चार दिवसात 10 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मू-कश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ मिळून शोपियांच्या लकिरपूरमध्ये सर्च अभियानात गुंतलेले आहेत
Advertisement
Advertisement

जम्मू-कश्मीरच्या शोपियांमध्ये रविवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. पोलिस आणि केंद्रीय रिजर्व्ह पोलिस दल (सीआरपीएफ) द्वारे सुरू करण्यात आलेले संयुक्त ऑपरेशन अजूनही सुरू आहे. सेनाने ट्विट केले की, 'ऑपरेशन लकिरपूरमध्ये सुरू आहे. एक दहशतवादी ठार करण्यात आला आहे. घटनास्थळावरुन शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत.' चार दिवसात आतापर्यंत 10 दहशतवादी मारले गेले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबरदारी म्हणून शहरात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. शहराच्या बहुतांश भागात लोकांच्या बाहेर फिरण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

शनिवारी पाकिस्तानी ड्रोनला शूट करण्यात आले 

एक दिवसपूर्वी जम्मू-कश्मीरच्या कठूआच्या पनसर परिसरात बीएसएफने एक पाकिस्तानी ड्रोन शूट केले होते. पाकिस्तानकडून या ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांना हत्यार पाठवले जात होते. यामध्ये एक अमेरिकन राइफल, दोन मॅग्जीन आणि इतर हत्यार होते. हे कंसाइनमेंट एका अली भाई नावावर आले होते. हे भारतीय परिसरात 250 मीटर आत होते. पीएसएफच्या  जवानाने 9 राउंड फायरिंग करुन ड्रोन हाणून पाडले. 

Advertisement
0