आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Encounter Video; Jaish E Mohammed Terrorists Killed In Kulgam, Latest News And Update 

जीव वाचविण्यासाठी जवानाने दहशतवाद्याला दिली संधी:व्हिडीओ कॉलवर आत्मसमर्पण करण्यास सांगितले; न ऐकल्याने अखेर ठार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अहवातू भागात मंगळवारी संध्याकाळी भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

विशेष बाब म्हणजे या चकमकीदरम्यान भारतीय लष्कराच्या जवानाने एका दहशतवाद्याला व्हिडिओ कॉलकरून आत्मसमर्पण कऱण्याचे सांगितले. तरी देखील तो न मानल्याने अखेर त्यास ठार मारण्यात आले. जवान आणि दहशतवाद्यात झालेल्या संवादाचा व्हिडिओही समोर आला आहे.

व्हिडिओत दिसून येत आहे की, चकमकीदरम्यान लष्करातील एक जवान दहशतवाद्याला समजावून आत्मसमर्पण करण्यास सांगत आहे. त्यांच्याभोवती इतर सैनिक उभे आहेत. त्याचवेळी, दहशतवादी मोहम्मद आसिफ म्हणाला की, मी भारतीय सैन्याचा खूप आदर करतो. लष्कराचा काश्मीरला मोठा पाठींबा आहे. मात्र, मी मृत्यूच्या अगदी जवळ आहे. शरण जाण्यास सहमत नाही. यानंतर काही वेळातच चकमकीत दहशतवादी मोहम्मद आसिफ मारला गेला.

ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक परदेशी

दहशतवादी मोहम्मद आसिफ हा कुलगामचा आहे. त्याचवेळी चकमकीत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एका परदेशी दहशतवाद्याचाही समावेश आहे. या दहशतवाद्यांकडून 2 AK-47, एक पिस्तूल, ग्रेनेडसह अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, मारले गेलेले दहशतवादी काश्मीरमधील अनेक घटनांमध्ये सहभागी होते.

जवानाने दहशतवाद्याशी 35 सेकंद व्हिडिओ कॉलवर संवाद केला
दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी कुलगामच्या अहवातु भागाला वेढा घातला आणि मंगळवारी शोध मोहीम सुरू केली, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. या महिन्यातच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 5 चकमक झाली असून त्यात 10 दहशतवादी मारले गेले आहेत.

कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान जखमी
सोमवारी रात्री काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वेस बाटपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या चकमकीत लष्कराचा एक जवान आणि दोन नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अबू हुरैरा असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानचा रहिवासी असून तो अ श्रेणीचा दहशतवादी होता.

25 सप्टेंबर रोजी कुपवाडा येथे 2 दहशतवादी मारले गेले
25 सप्टेंबरलाही कुपवाडा येथे लष्कर आणि पोलिसांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. एलओसी टेकरी नारजवळ ही कारवाई करण्यात आली. दोन्ही दहशतवाद्यांकडून दोन एके-47 रायफल, 2 पिस्तूल आणि 4 हातबॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. वृत्तसंस्थेनुसार, दोन्ही दहशतवादी सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सुरक्षा दलांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

14 सप्टेंबर रोजी दोन AGuH दहशतवादी मारले गेले
14 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील नौगाम भागात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पुलवामा येथील एजाज रसूल नजर आणि शाहिद अहमद अशी दोघांची नावे आहेत. ते अन्सार गजवत-उल-हिंद (AGuH) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. 2 सप्टेंबर रोजी पुलवामा येथे बंगालमधील मुनीर उल इस्लाम या मजुराच्या हत्येमध्ये हे दोन्ही दहशतवादी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...