आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू काश्मीरच्या कुपवाडा व कुलगाममध्ये रविवारी झालेल्या 2 चकमकींत सुरक्षा दलांनी 4 अतिरेक्यांना यमसदनी पाठवले. कुपवाड्यातील चकमकीत ठार झालेल्या 2 अतिरेक्यांपैकी एकजण पाकच्या लश्कर ए तोयबा या कुख्यात अतिरेकी संघटनेचा सदस्य आहे. पोलिस महानिरिक्षक विजय कुमार यांनी सुरक्षा दलांनी या भागात आणखी 2-3 अतिरेक्यांना घेरल्याची माहिती दिली आहे.
अतिरेकी शौकतने दिली खबर सुरक्षा दलांनी नुकतीच शौकत अहमद शेख नामक अतिरेक्याला बेड्या ठोकल्या होत्या. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर रविवारी कुपवड्यात मोहीम हाती घेतली होती. कुपवाड्यासह कुलगामच्या दमहाल हांजी पोरा भागात सुरक्षा दल व अतिरेक्यांत चकमक झाली. येथेही 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला.
शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलिस उपनिरिक्षकाचा गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह आढळला. घटनास्थळी 2 पिस्तुल व काडतुसेही आढळली. सब-इन्स्पेक्टर फारुख अहमद मीर (50) असे या पोलिसाचे नाव आहे.
ते पंपोराच्या लेठपेरात 23 बटालियन आयआरपीमध्ये तैनात होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुली व 1 मुलगा आहे. घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन राबवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.