आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Endless Stories Of Labors Deaths, The Claims In Different Cases Are The Same disorder, Illness, Hunger, Death By Heat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांच्या मृत्यूंची अंतहीन कथा:वडील दुधासाठी फिरत होते, मुलाचा तडफडून मृत्यू; आई गेली...तरी कफनरूपी चादरीलाच पदर समजून खेळत होता चिमुकला रहमत

मुझफ्फरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
आई गेली...तरी कफनरूपी चादरीलाच पदर समजून खेळत होता चिमुकला रहमत - Divya Marathi
आई गेली...तरी कफनरूपी चादरीलाच पदर समजून खेळत होता चिमुकला रहमत
  • मजूर घरी परतत होते, मृत्यूने त्याच्या घरी नेले
  • वेगवेगळ्या घटनांत दावे एकसारखे-अव्यवस्था, आजार, भूक, उन्हाने मृत्यू

> मुझफ्फरपूरमध्ये रेल्वेस्टेशनवर महिला मृत आढळली  > मुझफ्फरपूरमध्येच अडीचवर्षांच्या मुलाचा मृत्यू  > बलिया-वाराणसीत रेल्वेत आढळले ५ मजुरांचे मृतदेह  > चंदौलीत ४ मजुरांना रेल्वेने चिरडले

वडील दुधासाठी फिरत होते, मुलाचा तडफडून मृत्यू

घरी परतणारे मजूर, त्यांच्या मुलांचे मृत्यू या दुर्घटना सुरूच आहेत. अशाच आणखी सहा घटना समोर आल्या आहेत. पहिली घटना मुझफ्फरपूरमध्ये घडली, जेथे मकसूद आलम नावाचा एक मजूर दुधासाठी स्टेशनवर फिरत राहिला आणि साडेचार वर्षांचा मुलगा तडफडून मेला. मकसूद विशेष श्रमिक रेल्वेने दिल्लीहून कुटूुबासह घरी परतत होता. उन्हाचा पारा चढल्याने त्याचा मुलगा प्रवासातच आजारी पडला. मुझफ्फरपूरला पोहोचता पोहोचता त्याची प्रकृती आणखी बिघडली. दूध मिळण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले. दिल्लीत आपले सर्व साहित्य विकून मकसूदचे कुटुंब सीतामढीला परतत होते.

रेल्वे थांबली तेव्हा कळले की पाच जणांचे मृत्यू झाले

> बलिया, वाराणसी आणि दानापूरमध्ये ५ विशेष रेल्वेत ५ मजुरांचे मृतदेह आढळले. या रेल्वे मुंबई, सुरत अशा वेगवेगळ्या शहरांतून आल्या होत्या. यापैकी तिघे पूर्वीपासून आजारी होते.

> उत्तर प्रदेशातील चंदौली येथे रेल्वे रुळांवर झोपलेल्या चार मजुरांचा विशेष रेल्वेने चिरडल्याने मृत्यू झाला. यात ३ महिला होत्या. तर, बलिया व वाराणसीत विशेष श्रमिक रेल्वेत ४ मजुरांचे मृतदेह आढळले.

> मुंबईहून हावडाला जाणाऱ्या २९ वर्षीय हिफजूल रहमान यांचा रायपूर येथे मृत्यू झाला.

> सुरतहून यूपीतील जौनपूर येथे परतलेल्या तीन मजुरांचा अति ताप, खोकला आणि श्वसनाच्या त्रासानंतर मृत्यू झाला. या तिघांनाही कोरोनूचा संसर्ग झाल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने एकाचेच नमुने घेतले.

आई गेली...तरी कफनरूपी चादरीलाच पदर समजून खेळत होता चिमुकला रहमत

ही घटना मुझफ्फरपूरची आहे. दीड वर्षाच्या रहमतच्या आईचा मृत्यू झाला. उन्हामुळे श्रमिक रेल्वेत त्यांची प्रकृती बिघडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर ती आजारी होती आणि तिचे मानसिक आरोग्यही ठीक नव्हते, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र, आईचे काय झाले, कसे झाले, हे समजण्याचे रहमतचे वय नाही. त्याला एवढेच वाटले की भरदुपारी चादर पांघरून आई प्लॅटफॉर्मवर झोपली आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या नुकसानीपासून बेदखल रहमत आपल्या आईचे कफनच पदर समजून खेळत राहिला. त्याला वाटत होते की, थोड्या वेळात आई जागी होईल आणि म्हणेल... रहमत! बेटा कुछ खा ले. कोरोनाच्या संकटात मन विषण्ण करणारी ही घटना सोमवारी बिहारच्या मुझफ्फरपूर येथे घडली. याचा व्हिडिओ बुधवारी समोर आला. मृत महिलेचे नाव अरवीना खातून (२३) होते. बहीण आणि मेव्हण्यासोबत अरवीना २३ मे रोजी अहमदाबादहून मधुबनीला जाणाऱ्या विशेष श्रमिक रेल्वेने कटिहारला जात होत्या. प्रवासात रेल्वे बराच वेळ थांबली होती. २५ मे रोजी वाढत्या उष्म्यात मुझफ्फरपूर स्टेशन येण्याच्या काही तास आधीच तिचा मृत्यू झाला. मात्र, रेल्वेने म्हटले की, महिला आजारी होती आणि तिचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते. महिलेला दोन मुले आहेत, चार वर्षांचा अरमान आणि दीड वर्षाचा रहमत. रहमतच्या जन्मावेळी पतीने अरवीनाला सोडले होते.

बातम्या आणखी आहेत...