आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Energy: More Than One third Of The Country's Electricity Is Generated From Clean Energy Sources; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यश:देशात स्वच्छ ऊर्जास्रोतांपासून एक तृतीयांशहून जास्त वीजनिर्मिती; सौरऊर्जा क्षमतेत 13 पट वाढ

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक, भविष्यातील योजनांच्या प्रकरणात भारत तिसरा मोठा देश

२०२१ च्या पहिल्या तिमाहीच्या अखेरपर्यंत भारताच्या एकूण ऊर्जा क्षमतेत अक्षय्य ऊर्जेची हिस्सेदारी वाढून ३७ टक्क्यांपर्यंत गेली आहे. सेंट्रल एनर्जी अॅथॉरिटीच्या आकडेवारीनुसार, मोठ्या जलविद्युत प्रकल्पांसह भारतात स्थापन अक्षय्य ऊर्जा क्षमता १४१.४ गिगावॅट आहे. ही गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत १३४.६९ गिगावॅट होती. वार्षिक आधारावर यामध्ये ६.७१ गिगावॅटची वाढ झाली आहे. अक्षय्य ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने अनेक विकसित आणि विकसनशील देशांना मागे टाकले आहे. ब्रिटिश एनर्जी कंपनीच्या अभ्यासानुसार, ऊर्जा अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या प्रकरणात भारत जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, अक्षय्य ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूक आणि भविष्यातील योजना प्रकरणांत भारत जगात तिसरा आहे.

अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात काम करणारी खासगी संस्था मेरकॉम इंडियानुसार, एकूण स्थापित ऊर्जा क्षमतेत मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची हिस्सेदारी १२.१% आहे. सौरऊर्जेची हिस्सेदारी १०.७०% झाली आहे. ही गेल्या तिमाहीत १०.३३% होती. पवनऊर्जेची हिस्सेदारी १०.२५ टक्के आहे. बायोमासची हिस्सेदारी २.६५% आणि लहान जलविद्युत प्रकल्पांची हिस्सेदारी १.२४% आहे. ६ वर्षांत भारताने सर्व मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अक्षय्य ऊर्जा क्षमतेतील वृद्धीत सर्वाधिक वेगवान दर दाखवला आहे. भारताची अक्षय्य ऊर्जा क्षमता २.५ पट दराने वाढत आहे. भारताची एकूण सौरऊर्जा स्थापना ४० गिगावॅटच्या पुढे गेली आहे.

महारोगराईमुळे अर्थव्यवस्था मंदावल्यानंतरही भारताने साधले मोठे यश
गेल्या वर्षी कोविड-१९ मुळे आर्थिक हालचालीत घट आल्यानंतरही भारताने अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात वाढ प्राप्त केली आहे. २०२२ पर्यंत भारताचे उद्दिष्ट १७५ गिगावॅट अक्षय्य ऊर्जा क्षमता प्राप्त करण्याचे आहे. यासोबत २०३० पर्यंत एकूण ऊर्जा क्षमतेच्या ४०% बिगर जीवाश्म स्रोतांतून प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने सौर उपकरणांसाठी पीएलआय योजनाही लागू केली आहे. भारतात पारंपरिक साधनांतून ऊर्जा क्षमतेत वार्षिक आधारावर ०.३ टक्क्यांची घसरण आली आहे. गेल्या ६ वर्षांत भारतात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अक्षय्य ऊर्जेत सर्वात वेगवान सुधारणा

बातम्या आणखी आहेत...