आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडाच्या सेक्टर -168 च्या गोल्डन पाम सोसायटीत एका 26 वर्षीय तरुणाने 20व्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून उडी मारून आत्महत्या केली. मृतक नमन मदान सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो एका मुलीसोबत चंदीगडहून आला होता. त्याने काही दिवसांपूर्वीच हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याने आत्महत्या केली, त्यावेळी त्याची मैत्रीण खोलीत होती.
एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांच्या माहितीनुसार, तरुण व तरुणी दोघेही गुरुवारी एकत्र फ्लॅटमध्ये आले होते. मुलीने पोलिसांना सांगितले की, त्यांनी सलग 2 दिवस मद्यपान केले. शुक्रवारी दोघांत एका मुद्यावरून मतभेद झाले. त्यानंतर ती गार्डकडे जात होती. रात्री 9 च्या सुमारास खोलीतून बाहेर निघताच नमने बाल्कनीतून उडी मारली. तो रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्या एका महिलेच्या अंगावर पडला. त्यात ती महिला जबर जखमी झाली.
मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर, मुलगी कॉलेज टीचर
एडीसीपीने सांगितले की, नमन सेक्टर-15 सोनीपतचा राहणारा होता. तो बंगळुरूच्या वीवान कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. सध्या त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू होते. तर मुलगी एका खासगी महाविद्यालयात टीचर आहे. प्राथमिक तपासात दोघेही वर्गमित्र असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तरुणीची ताब्यात घेऊन चौकशी
पोलिसांनी चौकशीसाठी मुलीला ताब्यात घेतले आहे. तिच्या मते, दोघांत किरकोळ भांडण झाले होते. त्यानंतर तरुणाने आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, मुलाचे कुटुंबीय आलेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी सोसायटीच्या लोकांचाही जबाब नोंदवला जात आहे. यासंबंधी दाखल होणाऱ्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जाईल.
फ्लॅटमधून दारुच्या बाटल्या, भांग जप्त
पोलिसांनी खोलीची झडती घेतील. त्यात दारुच्या बाटल्या व भांग आढळली. तिथे सुसाइड नोट व धक्काबुक्कीचे कोणतेही पुरावे नाहीत. पोलिसांच्या मते, घटनेवेळी तरुणी मद्यधुंद स्थितीत होती. तरुणही त्याच स्थितीत असल्याचा संशय आहे.
एडीसीपी आशुतोष द्विवेदी यांनी सांगितले की, दोघांत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांच्या कुटुंबीयांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतरच आत्महत्येचे नेमके कारण समजू शकेल. दोघांनी या स्टुडिओ अपार्टमेंटचे ऑनलाइन बुकिंग केले होते. हे एक प्रकारचे सेवा अपार्टमेंट आहे. ते नोकरदारांना भाड्याने दिले जाते. हे फ्लॅट काही तासांसाठी सभा किंवा इतर कार्यक्रमांनाही भाड्याने दिले जातात.
रेस्टॉरंटमध्ये जेवणाऱ्या महिलेवर तरुण पडला
या घटनेत इमारतीखालील रेस्टॉरंटमध्ये जेवण करणारी एक महिलाही जखमी झाली आहे. नमन 20 व्या मजल्यावरून या महिलेच्या अंगावर पडला होता. त्यात महिलेच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.