आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:एज्युकेशन सिटी कोटात पुन्हा उत्साह; वसतिगृह भाड्यातही 30% झाली घट

कोटा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरातून 40 हजार विद्यार्थी दाखल, मार्च-एप्रिलमध्ये आणखी होईल वाढ

कोटामध्ये कोचिंगसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत देशभरातून सुमारे ४० हजार विद्यार्थी दाखल झाले आहेत. दुसरीकडे विद्यार्थ्यांना वसतिगृह भाड्यातही दिलासा मिळाला आहे. वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष शुभम अग्रवाल यांनी सांगितले, भाड्यात ३० टक्के घट झाली आहे. आधीच्या १५ ते २० हजारांऐवजी आता भाडे ७ ते १० हजार रुपये करण्यात आले आहे.

कोरोनाच्या आधी कोटामध्ये १.६५ लाख विद्यार्थी होते, मार्च २०२० मध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर ११ महिने कोचिंग क्लास बंद होते. कोटामध्ये सध्या सर्वाधिक विद्यार्थी बिहार व उत्तर प्रदेशातून आले आहेत. चंबळ वसतिगृह असोसिएशनचे अध्यक्ष शुभम अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, कोरोनाकाळाआधी कोटामध्ये बिहारमधून ६० हजार, तर यूपीतून ४० हजार विद्यार्थी यायचे. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मार्च- एप्रिलपासून कोटा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

सोबत आलेले पालकही घेत आहेत काळजी
कोटामध्ये विद्यार्थी- विद्यार्थिनींसोबत आतापर्यंत सुमारे पाच हजार पालकही आले आहेत. मुलांसोबत त्यांच्या आयांची संख्या जास्त आहे. त्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देत आहेत. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी सहकार्यही करत आहेत. कोरोनाकाळाआधी कोटामध्ये सुमारे १.६५ लाख विद्यार्थी होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन लागल्यानंतर जवळपास ११ महिने कोचिंग बंद होते. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरू होते. दैनिक भास्करच्या मोहिमेनंतर १८ जानेवारीला कोचिंग संस्था सुरू झाल्या.

सर्व कोचिंग क्लासेस, वसतिगृहात कोरोना प्रोटाेकॉल लागू
कोटातील कोचिंग संस्था आणि वसतिगृहात सर्व तयारी करण्यात आली आहे. कोचिंगमध्ये प्रवेश करताना थर्मल स्कॅनिंग अाणि सॅनिटायझेशनची व्यवस्था आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वर्गही ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. शिक्षक व विद्यार्थी मास्क आणि फेसशील्ड घालूनच वर्गात येतात. विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर आणि नर्सची नियुक्तीही करण्यात आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे तापमान मोजले जाते.

सध्या सर्वाधिक विद्यार्थी बिहार व उत्तर प्रदेशातून आले आहेत. चंबळ वसतिगृह असोसिएशनचे अध्यक्ष शुभम अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, कोरोनाकाळाआधी कोटामध्ये बिहारमधून ६० हजार, तर यूपीतून ४० हजार विद्यार्थी यायचे. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर मार्च- एप्रिलपासून कोटा येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा अग्रवाल यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...